KINWATTODAYSNEWS

किनवट नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट ची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

किनवट येथील नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हे पद मागील दोन वर्षापासून रिक्त असून सध्या हे पद प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तहसीलदार किनवट यांच्याकडे पदभार सोपविला आहे. त्यामुळे एकच अधिकारी यांच्याकडे दोन दोन पदे सांभाळणे प्रशासकीय कार्य भाराचा व्याप लक्षात घेता ते शक्य नाही.

किनवट/प्रतिनिधी: नगरपरिषद कार्यालय किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी आशा आशयाचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तालुका किनवट च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब (नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड) यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय कार्यालय किनवट तर्फे निवेदन सादर करण्यात आले.

किनवट येथील नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हे पद मागील दोन वर्षापासून रिक्त असून सध्या हे पद प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तहसीलदार किनवट यांच्याकडे पदभार सोपविला आहे. त्यामुळे एकच अधिकारी यांच्याकडे दोन दोन पदे सांभाळणे प्रशासकीय कार्य भाराचा व्याप लक्षात घेता ते शक्य नाही.
तसेच लवकरच नगरपरिषद किनवट ची सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे समजते त्यामुळे नगरपरिषद किनवट येथे पूर्ण वेळ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी यांची आवश्यकता आहे. या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन किनवट नगरपरिषद कार्यालयास पूर्ण वेळ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी याची नियुक्ती करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव, तालुका अध्यक्ष नसीर तगाले, कार्याध्यक्ष सय्यद नदीम, तालुका सचिव राजेश पाटील, तालुका उपाध्यक्ष गंगाधर कदम, सल्लाकायदेशीर सल्लागार एडवोकेट जी.एस.रायबोळे, ऍड. विलास सूर्यवंशी, युवा तालुका सचिव मारोती देवकते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

488 Views
बातमी शेअर करा