KINWATTODAYSNEWS

किनवट आगारातर्फे रस्ते सुरक्षा मोहीमेचे आयोजन.

किनवट (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कडून संपूर्ण राज्यात रस्ते सुरक्षा मोहिम सुरू केली आहे. नांदेड विभागातील किनवट आगारातर्फे रस्ते सुरक्षा मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन किनवट आगारात दि.११ जानेवारी रोजी सरस्वती महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख डॉ. मार्तंड कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 11 जानेवारी 2023 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात रस्ते सुरक्षा मोहिम आयोजित करण्यात आली नांदेड विभागांतर्गत रस्ते सुरक्षा मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून किनवट आगारातर्फे याच कालावधीत रस्ते सुरक्षा मोहीम साजरी करण्यात येणार आहे. सदर मोहिमेचे उद्घाटन 11 जानेवारी रोजी किनवटचे आगार प्रमुख संजय अकुलवार यांच्या अध्यक्षतेखाली सरस्वती महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. मार्तंड कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
सदर मोहिमेअंतर्गत आगारातील संपूर्ण चालक, वाहक यांचे परवाने नूतनीकरण तपासणी करण्यात येणार असून, चालक, वाहक यांत्रिक व सर्व कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी, नेत्र तपासणी इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

त्याचबरोबर सर्व कर्मचारी व प्रवाशांना रस्ते सुरक्षा विषयक माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख यांच्या कडून मिळाली. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी यशवंत खिल्लारे (कार्यशाळ अधिक्षक),शे.मो.स.गयासोद्दीन( वाहतूक निरीक्षक) गंगय्या सटलावार,
, वरिष्ठ लिपिक सुधिर डुबेवार, विजय परसोडे, गजेंद्र दासरवार इत्यादींची पुढाकार घेतला असून यासाठी सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी सहकार्य करावे असे आवाहन आगार प्रमुख संजय अकुलवार यांनी केले आहे.

127 Views
बातमी शेअर करा