KINWATTODAYSNEWS

होकर्णे यांची छायाचित्रे राजकीय व सामाजिक घटनांची साक्ष देणारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे गोरोवोद्गार

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:शहरप्रतिनिधी संधू: दि.8 छायाचित्रकार म्हणून विजय होकर्णे यांनी छायाचित्रण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला आहे.

नांदेड जिल्ह्याच्या अनेक राजकीय व सामाजिक घटनांची साक्ष त्यांच्या छायाचित्रातून मिळते.असे गौरोवोद्गार राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काढले.
हॉटेल मिडलँड येथे झालेल्या विजय होकर्णे यांच्या कार्यगौरव सोहळ्यात ते बोलत होते.श्री केदार जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्यसानिध्यात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर होते.

माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे, माजी आ.अमरनाथ राजूरकर,माजी मंत्री डी.पी.सावंत,
श्रीजया अशोकराव चव्हाण,माजी सभापती किशोर स्वामी, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे,काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संतोष पांडागले,वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या नव्या तंत्रज्ञानाच्या काळात छायाचित्रण क्षेत्रातही मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी दर्जेदार व उत्कृष्ट छायाचित्रण करुन या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते पुढे म्हणाले की, मागिल पन्नास वर्षातील स्व. शंकरराव चव्हाण व आमच्या कुटुंबीयांच्या राजकीय तसेच कौटुंबिक जीवनातील छायाचित्रांचा संग्रह विजय होकर्णे यांच्याकडे आहे.

कै.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात असलेले अनेक दुर्मिळ छायाचित्रेे महत्वाच्या जुन्या प्रसंगांच्या आठवणी देतात.कोणत्याही चित्रपट निर्मितीसाठी देखील त्यांची छायाचित्रे उपयोगी पडतील, इतकी ती बोलकी आणि दर्जेदार आहेत.

आजच्या स्पर्धेच्या युगात छायाचित्रण करणे जिकिरीचे असते,असे सांगताना ते म्हणाले की,मुंबई झालेल्या 26/11च्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेचे छायाचित्रण टाईम्स ऑफ इंडियाच्या छायाचित्रकारांने स्वतःचा जीव धोक्यात घालून केले होते.नांदेडच्या विकासात विशेषतः माझ्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचे पुरावे असलेल्या अनेक छायाचित्रांचा संग्रह देखील विजय होकर्णे यांच्याकडे आहे.

यावेळी बोलताना डी.पी.सावंत म्हणाले की,कै.शंकरराव चव्हाण व अशोकराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने होकर्णे यांच्या जीवनाचे सोने झाले.छायाचित्रण ही एक कला असून विजय होकर्णे हे कलासक्त छायाचित्रकार आहे.

नांदेड जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात झालेल्या घडामोडी व बदलांचे छायाचित्रण करुन होकर्णे यांनी आपले मोठे योगदान दिले आहे.

आपली छायाचित्रणाची कला त्यांनी जास्तीत जास्त लोकांना शिकवावी,असेही ते म्हणाले. कोणताही कलाकार राजकीय पाठबळामुळे मोठा होतो, अशोकराव यांनी होकर्णे यांना प्रोत्साहन दिले,त्यामुळे ते यशस्वी होऊ शकले.त्यांचा मित्रपरिवार मोठा असल्याचे प्रतिपादन भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले.तर माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे म्हणाले की,समाज जीवनाच्या सर्वक्षेत्रात होकर्णे यांचा कॉमेरा फिरला. ते नांदेडच नव्हे तर मराठवाड्याचे भूषण आहेत.

आ.अमरनाथ राजूरकर यांनी आपल्या भाषणातून होकर्णे यांनी शून्यातून विश्‍व निर्माण केल्याचे सांगितले.प्रारंभी दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी प्रास्ताविकपर भाषण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पांडागळे यांनी केले.

या कार्यक्रमाला माजी महापौर सौ.शैलजा स्वामी,सौ.जयश्री पावडे,माजी आमदार ईश्‍वरराव भोसीकर,माधवराव पाटील शेळगावकर,पंढरीनाथ बोकारे, एम.एस. पटणे,एकनाथ मोरे, संजय बेळगे,बालाजी पांडागळे, सौ.अरुणा विजय होकर्णे,महेश होकर्णे, भारत होकर्णे, वैभव जोशी आदींची उपस्थिती होती.

इतरांप्रमाणेच मलाही काम करण्याची संधी मिळाली, आवडत्या क्षेत्रात मला काम करता आले,मिळालेल्या संधीचे मी सोन करु शकलो. नांदेडकरांनी मला खुप प्रेम दिले.

श्री केदार जगद्गुरु,कै.शंकरराव चव्हाण,कुसुमताई चव्हाण व अशोकराव चव्हाण यांचे आशीर्वाद मला लाभले,अशा शब्दात छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

149 Views
बातमी शेअर करा