KINWATTODAYSNEWS

आज 9 जानेवारी 2023 पासून किनवट नगरपालिकेत प्रशासक राज राहणार !

किनवट/प्रतिनिधी: नगराध्यक्ष तथा नगरसेवक याचा 5 वर्षाचा कालावधी संपला असून 9 जानेवारीपासून किनवट नगरपालिकेत प्रशासन कारभार चालवणार आहे. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून निवडणूक तसेच नगरसेवक याची निवड दिनांक 13 डिसेंबर 2017 रोजी झाली होती. परंतु प्रशासकीय सोपस्कारांनंतर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक 9 जानेवारी 2018 रोजी झाली. मच्छेवार यांच्या 5 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपाचे उपनगराध्यक्षपदावर नेमानिवार चाडावार पुन्हा नेमानिवार यांना संधी दिली होती. दरम्यान विद्यमान नगरअध्यक्ष तथा पदाधिकारी नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपत असतानाच राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिनांक 15 डिसेंबर रोजी राज्यातील 12 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करण्याबाबत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र दिले आहे. राज्यात एकूण 16 पालिका पंचायती पैकी नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या नगरपालिकांचाही यात समावेश आहे. राज्यातील 21 नगरपरिषदा नगरपंचायतीच्या *सार्वत्रिक* निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम मतदार यादी कार्यक्रम व यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तीन ते चार महिन्याचा कालावधी लागणार आहे. या कालावधीसाठी पालिकेत प्रशासक राज राहणार आहे.

134 Views
बातमी शेअर करा