*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.8.जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध) येथील देशी दारु दुकान दिड वर्षापुर्वी महिलांनी दारू दुकान बंद केले होते. आडवी झालेली बाटल पुन्हा उभी झाली असल्याने सतंप्त रणरागिणीनी पुन्हा आडवी बाटल करण्यासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे.दि.७ जानेवारी २०२३ रोजी नायगाव (ध),बेल्लुर(खु),जाफलापुर व चिंचोली येथील शेकडो महिलांनी गावागावात जाऊन दारू विरोधी जनजागृती करत वर्गणी गोळा केले आहे.यामुळे
धर्माबाद तालुक्यातील तेगंणातील शेवटचं टोक असलेल्या नायगाव (ध) येथे बाजार समितीचे संचालक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड यांनी देशी दारुचे दुकान थाटले होते. तेलंगणात तर बेकायदेशीर दारुची भरमसाठ निर्यात होत होती एवढेच नसुन
येथील देशी दारू दुकानामुळे पुरुष मंडळी व्यसनाधीन बनत असल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त होते.
गावातच दारू मिळत असल्याने शाळकरी मुले चेंदापठ्ठी करून दारू पित होते.अनेक बायकांचे पती दारु मुळे मरण पावले असुन मुले सुद्धा वडीलांच्या पाऊलावर पाऊल टाकुन मुले सुद्धा व्यसनाच्या आहारी जात असल्याने येथील महिला दारू दुकान बंद करण्यासाठी आंदोलन केले.तहसीलदार,उपविभागीय अधिकारी धर्माबाद, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राजकीय नेत्यांना सुध्दा निवेदन दिले होते.एवढेच नसुन गावातील सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणूक वेळी निवडणूक होऊ दिली नाही.महिलाचा रुद्र अवतार पाहून महसूल व पोलीस प्रशासन नरम पडुन दुसऱ्या दिवशी सरपंच पदाची निवडणूक पोलिस बंदोबस्तात घेतली होती.रणरागीनी एवढ्यावरच न थांबता लढा चालुच ठेवुन एक महिन्यात ग्रामसभा घेण्यास भाग पाडले दि.५ मार्च २०२१ रोजी ग्रामसभेत गावातील एकूण ६३२ महीलांची संख्या पैकी ३७५ महिलांनी वर हात करुन दारुची आडवी बाटल केली.
दारू दुकान दिड वर्षे बंद होते.रमेश गौड यांनी गावात पुन्हा दारू दुकान चालु केल्याने गावात महिले मध्ये संताप निर्माण झाला.पुन्हा महिलांनी दारू बंदी साठी एल्गार पुकारला आहे.
दि.७ जानेवारी २०२३ रोजी नायगाव(ध),बेल्लुर(खु),जाफलापुर व चिंचोली येथील शेकडो महिलांनी गावागावात जाऊन दारू विरोधी जनजागृती करत.दारु बंद करण्यासाठी जो कागदपत्रे लागतील त्यासाठी वर्गणी गोळा करुन जणु चार गावात जनजागृती मोर्चा काढला.
यावेळी महिला बचत गट अध्यक्ष सुनीता संजय राजपोड, उपाध्यक्ष,रमाबाई नामदेव कांबळे,सदस्य लक्ष्मीबाई साईनाथ सूर्यकर,लक्ष्मीबाई कोंडीबा,शोभाबाई लक्ष्मण गायकवाड,लालाबाई नारायण कांबळे,देऊबाई जळबा कदम, शोभा लक्ष्मण मदनूरकर, गोरखनाथ मूतीवाड,शिवराम पाटील दत्तू पाटील विठ्ठल शंभोले,संजय राजपोड नूतीवाड
यावेळी परिसरातील महिलांनी सहभाग नोंदविला होता