*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6.जिल्ह्यातील लोकप्रिय सामाजिक जाण मतदार संघातीलचं नाही तर सर्वांच्या मदतीला धावून जाणारे अत्यंत कार्यक्षम आ.मोहन अण्णा हंबर्डे यांनी आज दर्पण दिनाचे ओचित साधून सर्व पत्रकारांना निमंत्रण देऊन त्यांच्या कार्यालयात बोलून पत्रकारांचा सत्कार केला आहे.
राज्यकर्ते, प्रशासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.पत्रकार हा लोकशाहीचा चौथ्या स्तंभ म्हणून ओळखला जातो,पत्रकार समाजातील प्रत्येक मानवाला आपल्या लेखनी द्वारे न्याय मिळवून देण्याचे काम प्रामुख्याने करतात.असे मत यावेळी मोहन अण्णा हंबर्डे यांनी व्यक्त केले.
यांयांनी गत स्मृतीळा उजाळा देत सर्व पत्रकारांना पत्रकारितेतील बारकाव्यासह भावी कार्यकाळासाठी सखोल मार्गदशन केले.यावेळी जेष्ठ पत्रकार मा.पंढरीनाथ बोकारे,मा.संजीवकुमार गायकवाड,शेख मोल्ला, उमरीकर,नकुल जेन,स्वप्नील, गव्हाणे,सुभाष दादा काटकांबळे,शहरातील अनेक पत्रकार व संपादक यांची उपस्थिती होती.