KINWATTODAYSNEWS

कवळे गुरूजीचा आर्दश इतरांनी घ्यावा माजी महापौर जयश्रीताई पावडे यांचे प्रतिपादन..व्हीपीके कवळे पतसंस्थेच्या बाराव्या शाखेचे छञपतीचौक नांदेड येथे शुभारंभ

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.8.जिल्यातील अल्पावधीत यशस्वी उद्योजक यांनी तळागाळातील कष्टकरी शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार, यांना पतसंस्थेच्या माध्यमातुन लोकाभिमुख सामाजिक कार्यकरता हे मौलाचे कार्य कवळे गुरूजी यांचे आहे.तसेच कवळे पतसंस्था,कारखाने,दुग्धव्यवसाय गुळपावडर सांभाळता हे महान कार्य आहे.इतरांनी कवळे गुरूजीचा आर्दश घ्यावा असे महापौर जयश्रीताई निलेश पावडे यांनी प्रतिपादन केले.

छञपती चौक नांदेड येथे व्हीपीके कवळे पतसंस्थेच्या बाराव्या शाखेचे शुभारंभ नांदेडच्या माजी महापौर जयश्रीताई निलेश पावडे याच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे गुरूजी,प्रमुख पाहुणे नगरसेविका ज्योतीताई किशनराव कल्याणकर,नगरसेवक प्रतिनिधी दिपक पाटिल,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष पाटिल शिरसाट,विनायकराव पाटिल शिंदे,प्रशांत पाटिल धानोरकर, व्ही.आर मानेवर,विश्वनाथराव,संचालक प्रभाकरराव पुयेड,संचालक गणेशराव पाटील ढोलउमरीकर, महाजन उत्तरवार,तज्ञसंचालक अनिल काचावार,नारायण हिवरे, नायब तहसीलदार सुनिल माचेवाड,अशोकराव पोफळे,प्रभाकरराव लव्हेकर माजी ग्रामविकास आधिकारी लक्ष्मीकांत कोत्तावार,मधुकर पाटील बोळसेकर,श्रीनिवास पाटील ढगे,सरव्यवस्थापक नामदेवराव इंगोले,सीईओ उदयकुमार कुलकर्णी, आण्णाराव पाटिल शिंदे उपस्थित होते.प्रस्ताविकात कवळे पतसंस्थेचे  खातेदार, कर्जदार,ठेवीदार व सामाजिक कार्य केलेल्या  कामाचे  सीईओ उदयकुमार कुलकर्णी यांनी सखोल माहिती दिले.मारोतराव कवळे गुरूजी यांनी केलेले पतसंस्थेचे कार्याचा मनोगतातून  कामाना शुभेच्छा देण्यासाठी महापोर जयश्रीताई निलेश पावडे,श्री.कोल्हेवाड,महाजन उप्पलवाड,विठ्ठलराव माने,विनायकराव पाटिल शिंदे,संतोष पाटिल शिरसाट,मधुकरराव पाटील बोळसेकर दिले.

 अध्यक्षीय भाषणातुन चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी बोलताना म्हणाले मराठवाड्यातील आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही पतसंस्थेकडुन शेतकरी,सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसाईकासाठी मदत केले आणी उद्योग उभारून सन्मानाने जीवन जगता आहेत.

सहकार क्षेत्रात काम करताना ठेवीदारांचा विश्वास वाढवल्याने पतसंस्थेत मोठ्याप्रमाणात ठेवी दिले.स्वगीय शामराव पाटील कदम,शंकरराव चव्हाण,बाबासाहेब गोरठेकर, बळवंतराव चव्हाण यांचा आर्दश घेऊन मी सहकार क्षेत्रात काम करता.कर्जदारानी बॅकेत पत वाढवले तर वाटेल तेवढे कर्ज देऊ.असे चेअरमन मारोतराव कवळे म्हणाले.यावेळी सुञसंचलन व आभार शाखाधिकारी विश्वाबंर जोगदंड यांनी केले.

124 Views
बातमी शेअर करा