मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबविण्यात आले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ माणगाव तालुका शाखेच्या वतीने माणगावचे प्रांत अधिकारी उमेश बिरारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. पगारे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच माणगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण युवा अध्यक्ष अनंत खराडे, कार्याध्यक्ष सागर पवार, रायगड जिल्हा संघटक प्रसाद गोरेगावकर, जिल्हा सल्लागार ॲड परेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, कार्याध्यक्ष, मंगेश पवार, उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री, सचिव रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नांदेड तालुका किनवटच्या वतीने मूकबधीर विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.
मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नसीर तगाले यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते नागनाथ भालेराव, सहशिक्षक विठ्ठल वडजे, तालुका कार्याध्यक्ष सय्यद नदीम, सचिव राजेश पाटील, उपाध्यक्ष गंगाधर कदम, युवा अध्यक्ष प्रणय कोवे, युवा सचिव मारोती देवकते, युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, सदस्य शेख खय्युम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी राज्य महिला अध्यक्षा सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, जिल्हाध्यक्ष लहू कुमार शिंदे, महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, वास्तववेदचे संपादक राजाभाऊ जाधव, फिरोज मुजावर, पठाण आय. एफ. आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने दिवंगत पत्रकार मारोती गव्हाळे यांना श्रद्धांजली वाहून पत्रकार दिन साजरा करण्यात आला व त्यांच्या लहान मुलीस आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी बिटरगाव पोलीस ठाणेचे ठाणेदार प्रताप भोस, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, भागवत काळे, सुनील ठाकरे, संदेश कांबळे, राजु गायकवाड, अशोक गायकवाड, शैलेश कोरडे, राज नप्ते, मैनोदीन सौदागर, गजानन नवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे यांनी शाळेला घड्याळ भेट देऊन पत्रकार दिन साजरा केला.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ फलटण कार्यकारिणीच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी फलटण तालुका अध्यक्ष संतोष बिचुकले व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव सर्व जिल्ह्यामध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर पत्रकार दिन साजरा ; संघटनेच्या वतीने राबविले विविध उपक्रम
68 Views