किनवट : डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने हिमायतनगर तालुक्यातील सोनारीफाटा येथे आयोजित सहाव्या बौद्ध धम्म परिषदेत शिक्षण सम्राट अभि.प्रशांत ठमके यांना सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी धम्म परिषदेचे अध्यक्ष किशोर भवरे, उद्घाटक पंजाबराव पाटील कोहळीकर, परिषदेचे संयोजक त्रिरत्नकुमार भवरे, निमंत्रक बालाजी राठोड, जोगेंद्र नरवाडे, कैलास माने, डॉ. मनोज राऊत, लक्ष्मणराव भवरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
किनवट तालुक्यात शैक्षणिक , सामाजिक , धम्म चळवळीत दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस निवृत्त प्राचार्य आर. जी. वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे, उत्तम कानिंदे, संस्कार सचिव अनिल उमरे, संरक्षण उपाध्यक्ष राहुल उमरे, वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संचालक सुरेश पाटील, योगतज्ज देविदास मुनेश्वर, दिलीप भगत, उप प्राचार्य सुभाष राऊत, भारत कावळे, अशोक सर्पे, रमेश मुनेश्वर, सिद्धार्थ पाटील, बाबाराव भगत,बंडु भाटशंकर, जनार्दन भगत, महेंद्र घुले, प्रा. आनंद सरतापे, रुपेश मुनेश्वर, सखाराम घुले, राहुल घुले, पांडुरंग भालेराव, अश्वत घुले, सागर शेंडे, प्रा.एस.डी.वाठोरे आदींसह भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा, वार्ड शाखा, तालुक्यातील सर्व ग्राम शाखेच्या व महिला मंडळाच्या पदाधिकारी यांनी त्यांचे कौतुक-अभिनंदन केले आहे.
अभि.प्रशांत ठमके सत्यपाल महाराजांच्या हस्ते डॉ.बाबसाहेब आंबेडकर समता गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत
116 Views