शिवणी प्रतिनिधी; किनवट तालुक्यातील मुद्दत संपलेल्या ५० ग्रामपंचायतचे मागील १८ डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.यात २० डिसेंबर २०२२ रोजी जाहीर केलेल्या निकालात मलकजाम तांडा येथील कपिल आडे यांची थेट सरपंच म्हणून निवड झाली.या अनुषंगाने आज दि.०४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी सरपंच कपिल आडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसह नवनिर्वाचित सरपंच व ग्रा.पं.सदस्य यांना पदभार देण्यासाठी तालुक्याचे तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून व्ही.व्ही.जळमकर तर कार्यक्रमाचे आयोजक म्हणून तलाठी विश्वास फड सह ग्रामसेवक अनिल बिल्ललवार व कोतवाल गोपीनाथ खुडे यांची नियुक्ती करण्यात आली होती.सदरील उपसरपंच निवडीच्या अनुषंगाने निवड कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनिर्वाचित सरपंच कपिल आडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदी तुकाराम राठोड यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.सदरील निवड प्रक्रिया शांततेत व्हावे या साठी इस्लापुर पोलीस स्टेशनचे सपोनि रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि भारत सावंत व येथील जेष्ठ नागरिक तथा प्रथम सरपंच म्हणून हरी आडे सह बिट अमलदार संदीप शेळके उपस्थित होते. सदरील उपसरपंच या पदाची निवड प्रक्रिया संपल्यावर उपस्थितांनी सरपंच उपसरपंच सह सदस्य सुंदरसिंग जाधव,निलाबाई आडे,लक्ष्मीबाई राठोड,अनिल चव्हाण सुमनबाई बोरकर,अंगुरीबाई राठोड यांचे सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या निवडी दरम्यान रमेश आडे,मारोती आडे,सखाराम राठोड,बापूराव चव्हाण ,जयवंत राठोड,संतोष बोरकर,रमेश राठोड,सह ग्रामपंचायत कर्मचारी शेखर भुरेवाड, इंदल राठोड सह तांड्यातील नागरिक उपस्थित होते.या निवडीनंतर भाजपा तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार,सह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तथा भाजपा ओबीसीचे तालुका सरचिटणीस गणपत राठोड, व सेवानिवृत्त अभियंता वेघाजी आडे,सौ.निलाबाई वेघजी आडे,भास्कर आडे सह तांड्यातील तरुण वर्ग व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.या वेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच हे तांड्यातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे म्हणत सर्वांचे आभार व्यक्त केले.
मलकजाम तांड्यात सरपंच कपिल आडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच तुकाराम राठोड यांची बिनविरोध निवड.
268 Views