किनवट: तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दरसांगवी (सि) येथील शशांक सुभाष कनाके हे सरपंच पदी विजयी झाले तर आज उपसरपंच पदासाठी अटीतठिच्या निवडणुकीत
सुरेखा विजय राठोड यांची बिनविरोध निवड करण्यातआली.
दिनांक 3 जानेवारी रोजी ग्रामपंचायत दरसांगवी सि येथे उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली या ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून तहसील कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी श्री काळे व्हि.बी यांनी काम पाहिले .
त्यांना मदत म्हणून ग्रामसेवक पांचाळ. पोलीस काॅ.कदम यांनी सहकार्य केले. या वेळी सुरेखा विजय राठोड यांचा उपसरपंच पदांसाठी एकमेव अर्ज असल्याने
उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले
या ठिकाणी सदस्य पुंजाराम प्रकाश कनाके, निर्मला नंदु पवार,
शत्रुघ्न नारायण मैश्राम, सुहास गोबरा राठोड, शिवकन्या विष्णु पेंदोर इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी संरपच व उपसरपंच यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
संरपच यांच्या हास्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावातील नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट युवा तालुकाध्यक्ष प्रणय कोवे यांचा व ट्रायबल सेवा न्युज चॅनल चे स्वीय सहायक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ ता.प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके यांचा सुद्धा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सखाराम पवार रमेश पवार दिलीप राठोड आदींनी व संरपच पदी निवडुन आलेला शंशाक कनाके व उपसरपंच पदी सुरेखा विजय राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले
किनवट तालुक्यातील दरसांगवी (सि) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सुरेखा विजय राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली
96 Views