KINWATTODAYSNEWS

अखेर बेंदी तांडा ग्रामपंचायत उपसरपंच पदी चंपत कनीराम जाधव सर यांची बिनविरोध निवड

किनवट/प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील बेंदी तांडा गावाची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये पार पडली निवडणुकीमध्ये थेट सरपंच म्हणून सौ अंजनाबाई मनोहर पेंदोर ह्या दिनांक 19/12/2022 रोजी घोषित निकालामध्ये बहुमताने निवडून आल्या यासोबत गावातील सर्व सदस्य मतदानातून निवडून आले या सर्व टीमचे नेतृत्व रामराव हिरामण राठोड यांनी नियोजनबद्ध गावातील ज्येष्ठ नागरिक व जागरूक नागरिकांना सोबत घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडली तसेच आज दिनांक 03/01/2023 रोजी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली निवडणुकीमध्ये सर्व विजयी सदस्यांच्या एकमताने विजयी उमेदवारापैकी चंपत कनीराम जाधव यांना उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले यावेळी गावातील विजयी उमेदवार सौ.सुलोचना साहेबराव राठोड, बबीता ईश्वर जाधव, संतोष गोबरा पवार, भीमराव मनोहर पेंदोर, मनोहर देवबा पेदोर यांच्यासह गावातील रामराव हिरामण राठोड, उत्तम महाराज, मधुकर राठोड, अशोक चव्हाण, उमेश राठोड, अर्जुन जाधव, उदाराम नामा, सकाराम नंदू, भिकू वसंता, निरंजन गोविंद, एस के राठोड, बापूराव मेश्राम (डीलर), डी आर राठोड, प्रेमसिंग किशन, नागोराव राठोड, यादव आडे, राम नाईक, रमेश जाधव, प्रकाश मंगु, बाबूलाल मंगु गजानन सिताराम, रामराव मोहन, धर्माई गोमा, शेषेराव लाईनमन, जयवंत आनंदराव, विनोद वेंकटराव, किशोर महिपत, भिकू संग्राम, उल्हास प्रताप, उल्हास दोगला, श्याम बन्सी, प्रमोद बळीराम, नितीन रंगराव, प्रेम सिंग सकरू, परविन गंगाधर, लालसिंग रतन, बळवंत आनंदराव, रूपसिंग फत्तु, रामराव फुलसिंग, दीपक आडे, जितेंद्र आडे, राम चंदू, ज्ञानेश्वर ऑपरेटर, सुभाष आडे, रंगराव हिरामण, भारत महाराज, गजानन चंदू, लव वसराम, आनंदराव नारायण, किशोर रमेश, परसराम चापला, रायसिंग चेंड्या, भारत शेषेराव, रवींद्र धर्मा, सुनील भिमराव, वसंत आडे, विनोद बळीराम हे सर्वजण उपस्थित होते यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री सिडाम तर सचिव तथा ग्रामसेवक यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत उपसरपंच म्हणून चंपत जाधव सर यांना बिनविरोध घोषित केल्याने वरील उपस्थित नागरिकांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला

284 Views
बातमी शेअर करा