किनवट : शासनाच्या महुसलावर नेहमीचं दरोडा टाकणाऱ्या स्टोन क्रेशर चालकांच्या मनमानी कारभाराने नेहमीचं सामान्य नागरिकांची आणि खुद्द महसूल प्रशासनाची गोची केलेली आहे. रात्री बे रात्री ब्लास्टिंग करत रात्रभर क्रेशर चालत असल्याने रात्री मुक्त संचार करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या सहवासात अडथळा निर्माण केला आहे.प्रचंड धुळीचे लोट सगळीकडे पसरलेले आहेत ज्याने आजूबाजूचे 5 किमी परिसरातील शेतकऱ्यांचे पिकं हातातले नेहमीचं गेली असून त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढल्या आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना गंभीर आजाराने ग्रासले आहे. अश्या या गंभीर बाबी कडे सामाजिक कार्यकर्ते, सा. किनवट शक्ती पेपरचे संपादक प्रशांत वाठोरे यांनी मागील 5 वर्षांपासून शासन दरबारी आवाज उठवला होता त्याची नाममात्र दखल होत होती; मात्र ठोस अशी कार्यवाही होत नव्हती.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे आमरण उपोषणाला सुरुवात करताच किनवट तहसीलचा तहसीलदार मॅडम यांनी दिनांक 27 डिसेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालय मार्फत ETS मोजणी करण्याचे आदेश दिले होते आणि लगेचच 29 डिसेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालयला लेखी निर्देशित करत किनवट तालुक्यातील सर्वच स्टोन क्रेशरचा ETS मोजणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांचा समक्ष करण्याचे आदेश दिले आहेत.
वर्षानवर्षे शासनास नाममात्र रॉयल्टी भरून हजारो ब्रास दगडाचे उत्खनन करत शासनाच्या महसुलावर खुले आम दरोडा टाकणाऱ्या या महसूल चोरांचे पितळ उघडे पडणार असल्याने यांचे धाबे दणाणले आहेत.निष्पक्षपणे मोजणी होऊन परिपूर्ण महसूल शासन दरबारी किती जमा होतो हे बघण्यासारखे राहिलं!
ETS मोजणी आदेशाने किनवट तालुक्यातील स्टोन क्रेशर चालकांचे धाबे दणाणले..!
130 Views