घुघुस/प्रतिनिधी:
घुघुस नगरपरिषद अस्तित्वात येऊन 5 महिन्याचा कालावधी लोटला असला तरी मुख्य अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही.
ती ताबडतोब करण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागासवर्गीय सेल तर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.
घुघुस येथील तहसीलदार गोंडा पूर्वी हप्त्या मधून 2 वेळेस घुगुस येथे भेट देत असत. परंतु सध्या दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरी ते अद्याप आले नसल्यामुळे येथील अनेक महत्वाची कामे खोळंबली आहेत. तसेच अनेक प्रश्न मार्गी लागले नाहीत. तेव्हा ताबडतोब तहसीलदार यांनी येथे उपस्थित राहावे तसेच मुख्य अधिकाऱ्याचे पद ताबडतोब भरावे कारण नगरपालिका ची अनेक कामे मार्गी लागणे आहेत.अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल ता.अध्यक्ष सत्यनारायण डकरे,बुध्दभूषण कांबळे,महिला ता.सौ.सुशीलाताई डकरे यांनी केली आहे.
116 Views