किनवट ( शहरप्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाची किनवट तालुका कर्मचारी संघटनेची बैठक बाबासाहेब मुखरे विद्यालय किनवट येथे आज दिनांक 31 डिसेंबर2022 रोजी संपन्न झाली. या बैठकीस संघटनेचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष गजानन पाटील सोळंके संघटनेचे किनवट तालुकाध्यक्ष अशोक हिंगणे, माजी तालुकाध्यक्ष बळीराम राठोड यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनाच्या महामंडळाचे राज्य अधिवेशन 8 जानेवारी 2023 रोजी सांगली येथे होणार आहे. हे अधिवेशन 50 व्या सुवर्ण महोत्सवी राज्य अधिवेशन असून, या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब मार्गदर्शन करणार आहेत. शासनाच्या वतीने 7,8,9 जानेवारी 2023 अधिवेशनासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आपल्या अडीअडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी तालुक्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आव्हान तालुकाध्यक्ष अशोक हिंगणे यांनी केले आहे.
या बैठकीस सुदर्शन मुंडे ,बापूराव शिंदे, आनंद सोनटक्के ,जयदीप राठोड, साईनाथ नरवाडे, के आर., वाघमारे, डी. डी. ,रुपनोर, एस.आर. चव्हाण, शेंडे सर यांच्यासह अनेक शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाची किनवट तालुका कर्मचारी संघटनेची बैठक
118 Views