किनवट/प्रतिनिधी: नंदुरबार जिल्हा प्रमाणे माझ्या किनवट तालुक्यातलीही परिस्थिती सुद्धा तीच आहे. शबरी घरकुल योजने अंतर्गत अत्यंत कमी प्रमाणात उद्दिष्ट आहे. बहुसंख्य आदिवासी लोक घरापासून निवाऱ्यापासून वंचित आहेत. निवाऱ्याची योजना म्हणून ही योजना कार्यान्वित आहे. जास्तीत जास्त घरकुल मिळण्यासाठी उद्दिष्ट वाढवून देण्यात येणार आहे काय? असा प्रश्न किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी मंत्री महोदयाला विचारला आसता ते म्हणाले की,यावर्षी आम्ही जास्तीत जास्त घरकुल मंजूर केली आहेत. जवळजवळ 85 हजार घरकुल आम्ही मंजूर केलेले आहेत. आम्ही सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहेत की, जितक्या लोकांना घरकुल पाहिजे आहेत त्यांनी अर्ज करायचे व जितके अर्ज येतील तितक्या लोकांना यावर्षी आम्ही घरकुले देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आदिवासी मंत्र्यांनी यांनी दिले.
255 Views