KINWATTODAYSNEWS

वाई (बा) येथील दारूबंदी विषयी नांदेड राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतली दखल..!

माहूर /( चव्हाण )
माहूर तालुक्यातील वाई (बा) येथील देशी विदेशी दारू कायमस्वरूपी बंद करण्यात यावी यासाठी गावातील बाराशे महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यमार्फत राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड यांना देण्यात आले होते,
दारूबंदीसाठी देण्यात आलेल्या निवेदनाची दखल राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड यांनी घेतली असून आज दिनांक 28 डिसेंबर रोजी गावातील महिलांच्या दारूबंदीसाठी दिलेल्या बाराशे महिलांच्या स्वाक्षऱ्यांच्या पडताळणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे, निरीक्षक म्हणून ए.एम.शेख व त्यांचे सहकारी जाधव यांनी निवेदनकर्त्यांना भेट दिली व निवेदनाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड हे लवकरच पुढील कारवाई करणार असल्याची गवाही आज वाई ग्रामपंचायत येथे उपस्थित सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार व गावातील महिला समक्ष दिली,

एकंदरीत राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड यांच्या प्रथम कारवाईनंतर गावातील दारूबंदी या प्रकरणाला गती मिळाली असून लवकरच वाई येथे दारूबंदी संदर्भात आडवी व उभी बॉटल ची निवडणूक होणार असल्याचे संकेत दिसून येत आहे,

401 Views
बातमी शेअर करा