*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.27. मुख्य बसस्थानक नांदेड येथे नेहमीच काहींना काही स्थापन झाल्या पासून विविध उपक्रम विश्वासू प्रवासी संघटनेच्या वतीने घेतले जातात नांदेड बस्थानक येथे येणाऱ्या सर्वच प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी ही संघटना अहोरात्र झटत असते बस्थानक परिसरातील स्वच्छता असो की परिसरातील राज्यातून येणाऱ्या जाणाऱ्या बसेससाठी या संघटनेच्या वतीने संपूर्ण परिसर सिमेंट काँकरीटिकरण करण्यात येत असून हे काम ही लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या मार्गांवर आहे.
मा.आ.मोहन अण्णा हबर्डे यांच्या निधीतून सुद्धा बस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या मुख रस्त्यावर पूला खाली गेली कित्येक वर्षा पासून पडलेल्या भलामोठा खड्याचे सम्पूर्ण सिमेंट काँकरीट टाकूण चांगला करण्यात आला आहे त्यासाठी श्री.शंकरराव नांदेडकर यांनी केलेल्या प्रेयत्नाचे यश म्हणावे लागेल.बस्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशी जनतेला स्वछ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे.गोरगरीब जनतेसाठी गुरुद्वारा लंगर साहिब यांच्या कडून रोज दोन टाईम मोफत जेवणाची वेवस्था ही या संघटनेने आज या संघटनेच्या वतीने वीर बाल दिवस निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.
याप्रसंगी विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.शंकरराव नांदेडकर बसस्थानक प्रमुख श्री.यासीन खान उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर सचिव मा.श्रीमती प्रा.ललिताताई कुंभार तथा सदस्य इजी.श्री.मा.हरजिंदरसिंग संधू,तसेच सदस्य श्री. मा.संजीवकुमार गायकवाड व रामजी भुजंगा कांबळे व प्रवासी तथा कर्मचारी उपस्थित होते.