किनवट : 15 दिवसांपूर्वी भ्याड हल्यात गंभीर जखमी झालेले किनवट येथील सराफा व्यापारी श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार त्यांचे हैदराबाद येथे उपचारा दरम्यान निधन झाले. काल दिनांक 28/12/2022 रोजी त्यांचे अवयव दान झाले त्यांचे 2 डोळे, 2 किडनी, यकृत, हृदय, फुफुसे दान झाल्यावर रात्री त्यांचा मृत्यू देह किनवटला आणला गेला. आज दि.29/12/2022 दुपारी 12 वाजता त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येइल. त्यांचे राहते घर सरस्वती कॉलनी, VIP रोड येथून अंत्ययात्रा सुरु होईल.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी श्रीकांत व व्यंकटेश या दोन कांचर्लावार बंधू वर जीवघेणा हल्ला झाल्यावर हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना श्रीकांत कांचर्लावार यांचा दिनांक 27 रोजी मृत्यू झाला.
कांचर्लावार बंधु वरील हल्ल्यातील प्रकरणी पोलिसांनी योग्य तपास केला नाही, हल्लेखोरांना अटक न केल्याचा टप्पा ठेवून व्यापारी असोसिएशनचे ता.अध्यक्ष दिनकर चाडावार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांची भेट घेऊन पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करून तक्रार करण्यात आली.
यात आरोपीस तात्काळ अटक न केल्यास दिनांक 29 रोजी किनवट बंद करून श्रीकांत चा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला जाईल आणि साखळी उपोषण ही करण्यात येईल असा इशारा दिला आहे. शिवाय हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न करण्यात येणार असल्याचे त्या तक्रारीत नमूद आहे. मयत श्रीकांत व व्यंकटेश कांचर्लावार बंधू हत्याची राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही गंभीर दखल घेतली आहे. किनवटच्या पोलीस निरीक्षकास निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची मागणी करणारे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि. 28 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात दिले.
खरे तर अशा गंभीर प्रकरणी पोलिसांनीच तात्काळ कार्यवाही करणे अपेक्षित असताना ते केलेले नाही. पोलिसाविरुद्ध प्रचंड नाराजी पसरलेली असल्याचा गंभीर आरोप सदर पत्रात नमूद आहे. आता या पत्रावर फडणवीस काय कार्यवाही करणार याकडे सर्व किनवटवासी यांचे लक्ष लागून आहे.