KINWATTODAYSNEWS

किनवट ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा सह राष्ट्रवादी काँग्रेसचे ही वर्चस्वाचे दावे/प्रतिदावे

किनवट/प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी निवडणुका पार पडल्यानंतर त्यांचा निकाल मंगळवारी 20 रोजी जाहीर करण्यात आला.
यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या जागा जास्त जिंकल्याचे सुतवाचक केले आहे. वर्चस्व सांगण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील निवडणूक पक्ष विरहित असतात अनेक पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन पॅनलच्या स्वरूपात निवडणूक लढवत असतात परंतु आज काल निवडुन आलेला उमेदवार हा आमच्याच पक्षाचा आहे असे राजकीय पक्षांना वाटून आमच्या पक्षाचेच ग्रामपंचायत मध्ये कसे वर्चस्व आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न होताना दिसून येत आहे. येणाऱ्या 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार असून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच विधानसभेची नांदी ठरणारअसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत च्या निवडणुकीत ही अनेक धनाडय उमेदवारांनी अमाप पैसा खर्च केला परंतु मतदारांनी नव्या उमेदवारांनाच पसंती दिल्याचे चित्र दिसून येत आहे. या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत ससर्वच पक्षातील दिग्गजांनी लक्ष घातले होते.
यावर्षी सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्यामुळे हया निवडणूका उत्सुकतेच्या बनल्या होत्या. ग्रामपंचायत च्या निवडणुका पक्षाचे नावाने व पक्षाच्या चिन्हावर लडवले नसतानाही सर्वच पक्षाने आपल्याच पक्षाचे सरपंच विजयी झाल्याच्या दावा केल्याने जनतेत तर संभ्रम निर्माण झाला आहे.
तालुक्यातील निवडणुका झालेल्या 53 ग्रामपंचायतीपैकी 38 जागी भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी 36 जागी सरपंच निवडून आल्याचे सांगितले आहे. नांदगाव तांडा व मारलागुंडा सारख्या कम्युनिस्टांचा प्रभाव असलेल्या गावी अपेक्षेप्रमाणे माकप प्रणित पॅनल सरपंच सह निवडून आले असल्याचे कॉम्रेड अर्जुन आडे यांनी सांगितले तर अंबाडी तांडा ग्रामपंचायत वर वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पॅनल विजय झाल्याचे माजी ता.अध्यक्ष किशन राठोड यांनी सांगितले.

279 Views
बातमी शेअर करा