जिवती/ प्रतिनिधी: जिवती तालुक्यातील नक्षलग्रस्त सीमावरती भागातील ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त गावांना विकासा करीता विशेष निधी देण्यात यावे अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट तर्फे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे कुंभेझरीचे तरुणतडफदार सरपंच लहूजी गोतावळे यांनी केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, ग्रामपंचायत कुंभेझरी व इतर जीवती तालुक्यातील सीमावर्ती भागातील ग्रामपंचायत मध्ये अनेक गावे ही तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमा वादामध्ये अडकलेली आहेत. त्यामुळे या गावांना विकासापासून मुकावे लागत आहे. अशा वादग्रस्त गावांना जिल्हा परिषद चंद्रपूर व महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष निधी देऊन या वादग्रस्त गावांचा विकास साधावा नाहीतर या गावांमध्ये तेलंगणा सरकार अनेक योजना राबवत आहेत. त्यामुळे या लोकांना तेलंगणामध्ये येण्यास भाग पाडत असल्याचे चित्र आहे.
तरी याबाबतीत आपण सदर बाबी विशेष बाब म्हणून समजून घेऊन या गावांमध्ये विशेष निधी देऊन या गावचा विकास साधावा अशी मागणी निवेदनाद्वारे कुंभेझरीचे तरूण तडफदार उपसरपंच लहुजी गोतावळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती जिवती तर्फे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
जिवती तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा नक्षलग्रस्त सीमावर्ती भागातील ग्रामपंचायती च्या वादग्रस्त गावांना विकासासाठी विशेष निधी द्यावा-उपसरपंच लहुजी गोतावळे
219 Views