KINWATTODAYSNEWS

तेलंगणा राष्ट्र समिती(T.R.S.) पक्षाचे माजी खासदार एन. घोडाम यांची किनवट अभीवक्ता संघास भेट.

किनवट (तालुका प्रतिनिधी) अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय किनवट येथे न दिल्यास किनवट/ माहूर तालुका तेलंगणात जाणार असे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब किनवट यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनास दिल्या नंतर शासन आता काय निर्णय घेईल ही बाब सर्वात महत्वाची असताना आज दिनांक 20/12/2022 रोजी तेलंगाना राष्ट्र समिती जी भारतीय राष्ट्र समिती असे ज्या पक्षाने धारण केले त्या पक्षाचे माजी खासदार यांनी भेट देऊन किनवट/माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती विषयी हितगुज केली..
नवोदित वकिलास तेलंगाना राज्यात विकासात्मक योजना आहेत त्या महाराष्ट्रात सुधा सुरू होतील व तेलंगाना राज्या प्रमाणे शेतकऱ्याचा विकास साधण्यासाठी आमचा पक्ष कटिबध्द आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
सदर पक्ष महाराष्ट्रात कसा विजय प्राप्त करेल अथवा अजेंडा कसा राबवेल असे ॲड विलास शामीले (सुर्यवंशी) यांनी विचारले असता माजी खासदार यांनी आम्ही शेतकरी शेतमजूर यांच्या विकासा साठी कटिबध्द आहोत असे सांगितले आमचे शासन तेलंगणात विकास करून तेलंगाना पॅटर्न आमच्या साठी चांगली बाब आहे महाराष्ट्रात विकास करणे हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक सुकर आहे असे सांगितले..
अभिवाक्ता संघाचे उपाध्यक्ष ॲड कुरेशी साहेब यांनी सुधा किनवट माहूर /तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती विषयी खासदार साहेब यांना अनेक प्रश्न विचारून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उभारण्यासाठी प्रयत्न करावे त्यावर माजी खासदारांनी तेलंगाना राज्याचे मुख्मंत्री यांना भेटून विनंती तथा सूचना करावी असे सूचित केले लवकरच तेलंगाना राज्याचे मुख्य मंत्री यांना अभिवक्ता संघ भेट देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रां कडून माहिती मिळाली आहे..
तेलंगणा राष्ट्र समिती चे पदाधिकारी भेट देत असल्या मुळे किनवट/माहूर तालुक्या चां विकास साधण्यासाठी निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार आम्ही उभे करणार आहोत तेंव्हा संपूर्ण जनतेने साथ द्यावी अशी विनंती केली..
यावेळी अभिवक्ता संघाचे सचिव ॲड पंकज गावंडे साहेब ॲड ताजने साहेब ॲड. एस. डी. राठोड, ॲड, उदय चव्हाण साहेब ॲड वैद्य साहेब, ॲड. किशोर मुनेश्र्वर साहेब ॲड. येरेकर ॲड. टेकसिंघ चव्हाण ॲड,
कृष्णा राठोड ॲड सोनकांबळे साहेब ॲड नयन मूनेश्र्वर ॲड काळे साहेब ॲड, सर्पे साहेब
ॲड. पुरुषोत्तमवार साहेब इत्यादी उपस्थित होते..

686 Views
बातमी शेअर करा