KINWATTODAYSNEWS

किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे बंटी फड यांच्या वर खोटे गुन्हे दाखल झाल्याप्रकरणी वाहन चालक संघटना तर्फे निवेदन

किनवट/प्रतिनिधी: आज किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे बंटी फड यांच्या वर खोटे गुन्हे दाखल झाल्याप्रकरणी वाहन चालक संघटना तर्फे निवेदन देण्यात आले.
किनवट शहरात महिलांच्या नावे खोट्या गुन्ह्यात राजकीय सामाजिक पुरुषांना अडकवण्याचे प्रकार वाढल्याचे बोलले जात असून अश्या प्रकारनामध्ये ही महिला व पोलीस कर्मचारी हे संगणमत करून पैसे उकलण्याचे प्रकार किनवट शहरात वाढत आल्याची चर्चा आहे. दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी बंटी फड यांच्यावर राजकीय दबावाखाली दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करावा व भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे नोंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. बंटी फड यांचे सामाजिक क्षेत्रात चांगले काम करत असून यामुळेच बंटी फड यांना अडकवण्यात आले आहे.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी वाहन चालक संघटनेचे युवक निवेदन देताना उपस्थित होते.

86 Views
बातमी शेअर करा