KINWATTODAYSNEWS

50 ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांचं भवितव्य  82.25 टक्के मतदारांनी मतदान यंत्रात केलं बंद

किनवट : रविवारी (दि.18 ) तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी 146 मतदान केंद्रावर निवडणूक लढविणाऱ्या सरपंच पदाच्या 137 व सदस्य पदाच्या एकूण 722 उमेदवारांचं भवितव्य  82.25 टक्के मतदारांनी मतदान करून केलं मतदान यंत्रात बंद.

          सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी  नेहा भोसले,भाप्रसे व निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांनी सकाळ पासून तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर जाऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित शांतपणे पार पडत असल्याचा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष पाहणीत घेतला.

         बुधवार पेठ, शनिवार पेठ ही दोन गावे तसेच 07 सरपंच व 77 सदस्य बिनविरोध झालीत. सक्रुनाईक तांडा येथून एकही नामनिर्देशन दाखल झालं नाही. त्यामुळे ही तीन गावे वगळता उर्वरित 50 ग्राम पंचायतीसाठी 146 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. 21105 पुरुष मतदार , 19316 स्त्री मतदार व 01 असे एकुण मतदार 40422 होते. यापैकी 17562 पुरुष व 15687  स्त्री असे एकूण 82.25 % मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

        निवडणूकीकरिता क्षेत्रीय अधिकारी 9, मतदान केंद्राध्यक्ष 179, मतदान अधिकारी एक 179, मतदान अधिकारी दोन 185 व मतदान अधिकारी तीन 185 असे राखीव सह 728 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. 

           या सर्वांना मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी संगणक सहायक तथागत पाटील यांच्या साथीने पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन द्वारे निवडणूक प्रशिक्षण दिले होते. तसेच मास्टर ट्रेनर मल्लिकार्जून स्वामी यांनी रमेश मुनेश्वर यांच्या साथीने मतदान यंत्रांची माहिती दिली होती. तसेच सर्व मास्टर ट्रेनर यांनी मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण गजानन मंदिर परिसरात नुकतेच दिले होते.

           निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक यांच्या नेतृत्वात व्ही.टी. सूर्यवंशी , एन.जी. कानगुले, विश्वास फड यांनी निवडणूकी करिता उपलब्ध केलेली 146 नियंत्रण संच व 193 मतदान यंत्रे स्विकारली, नायब तहसिलदार अनिता कोलगणे यांच्या नेतृत्वात अव्वल कारकून, महसूल सहायक , मंडळ अधिकारी , तलाठी , कोतवाल , शिपाई यांनी इतर महत्वाचे साहित्य स्विकारले.

        वाहन कक्ष प्रमुख प्रकाश टारपे व देवकते यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस 11, स्कूल बस 5, कुझूर 9 व शासकीय जीप 7 अशी वाहन व्यवस्था केली होती. गोविंद पांपटवार व पी.पी. सूर्यवंशी यांनी अल्पोपहार व चहा-पाणी याची उत्कृष्ट व्यवस्था केली. अब्दुल फारुख यांनी मतदान केंद्राकरिता कंपार्टमेंट स्विकारले. निवडणूक विभागाचे नितीन शिंदे यांनी सर्व साहित्य व संदीप पाटील यांनी सर्व मनुष्यबळ पुरविले.

        निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी 1, पोलिस निरिक्षक 1, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उप निरिक्षक 19 पोलिस अंमलदार 183 व होमगार्डस् 260 असा तगडा पोलिस बंदोबस्त उप विभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांनी लावला होता.

100 Views
बातमी शेअर करा