किनवट/प्रतिनिधी: आज किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे बंटी फड यांच्या वर खोटे गुन्हे दाखल झाल्या प्रकरणी किनवट तालुक्यातील राजकीय महिला शिष्टमंडलांनी भेट घेऊन निवेदन सादर केले.
किनवट शहरात महिलांच्या नावे खोट्या गुन्ह्यात राजकीय सामाजिक पुरुषांना अडकवण्याचे प्रकार वाढले असून अश्या प्रकारनामध्ये ही महिला व पोलीस कर्मचारी हे मिळून व संगणमत करून पैसे उकलण्याचे प्रकार किनवट शहरात वाढले आहेत.
दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी युवा नेते बंटी फड यांच्यावर राजकीय दबावाखाली दाखल झालेला खोटा गुन्हा रद्द करावा व भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे नोंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. बंटी फड यांचे सामाजिक क्षेत्रात चांगले काम करत असून यामुळेच बंटी फड यांना अडकवण्यात आले आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी सौ. संध्याताई राठोड, शेख परवीन बेगम, भावनाताई दीक्षित, गंगुबाई परेकर, रजिया शेख, कविता गोनारकर, जयश्री भरणे, वंदना गाडेकर, वसंत राठोड, जितेंद्र कुलसंगे, संतोष कनाके,पवन गिरी, बालाजी कदम, रवींद्र सुपलवार, समीर शेख इत्यादी निवेदन देताना उपस्थित होते.
बंटी फड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाल्या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना महिलाशिष्ट मंडळाचे निवेदन
1,422 Views