चंद्रपूर: गडचिरोलीजिल्ह्यातील विविध मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली ते नागपूर विधान भवन 175 किलोमीटर पदयात्रेची सुरुवात तिसऱ्या दिवशी ब्रह्मपूरी येथून झाली. ब्रह्मपुरी ते नागभीड चा टप्पा पूर्ण झाला असून आतापर्यंत 75 किलोमीटर चा प्रवास पूर्ण झालेला आहे. यात फक्त गडचिरोली जिल्ह्यातीलच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील ही अनेक नागरिकांकडून मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठीक ठिकाणी गावकऱ्यांकडून आणि काँग्रेस नेते पदाधिकाऱ्यांकडून मोर्चाचे स्वागत सुद्धा होत आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विविध मागण्यांना घेऊन नागपूर विधान भवन येथे धडकणार आहे.
यावेळी यात्रेचे स्वागत करून पदयात्रेत सहभागी चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश डॉक्टर वारजूरकर, चिमूर तालुका अध्यक्ष डॉ. विजय गावंडे पाटील, नागभीड तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, शहर अध्यक्ष नागभीड डॉ. गावंडे, माजी नगरसेवक प्रतीक हसीन, मधुकर बावनकर, बबलू आठमांडे, महेश कुर्जेकर, किशोर समर्थ, रवी बडी, नंदू सातपुते, रमेश ठाकरे, दिनेश गावंडे, सौरभ मुळे, नंदकिशोर गावडे सह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.
विविध मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली ते नागपूर विधान भवन 175 किलोमीटर पैदल मोर्चाचा दिवस तिसरा
235 Views