KINWATTODAYSNEWS

स्व.हरिभाऊ मोरे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्य अर्थ फाउंडेशन द्वारा आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

गडचांदूर/प्रतिनिधी: समाजसेवक माजी सभापती नगरपरिषद गडचांदूर तथा उपवनसंरक्षक अधिकारी तसेच संचालक अर्थ फाउंडेशन स्व. हरिभाऊ मोरे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्य अर्थ फाउंडेशन द्वारा आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी रविवारी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत स्थळ: अर्थ क्लिनिक गडचांदूर येथे सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन तथा स्वर्गवासी हरिभाऊ मोरे यांच्या पुतळ्याचे अनावरण या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री रामभाऊ गुंडले माजी आमदार हेर मतदार संघ तथा माजी चेअरमन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ मुंबई यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.सविताताई टेकाम नगराध्यक्ष नगरपालिका गडचांदूर हे असणार आहेत.
तर प्रमुख पाहुणे म्हणून भानुदास कलवले, सुभाषराव निकाळजे ,गाठे सर, स्वप्निल टेंभे, प्रदीप खेरडे, सत्यजित आमले, संतोष गायकवाड, प्रभाकर शिंदे, उद्धव कांबळे, जी एस कांबळे, मेजर खंडारे, शरदभाऊ जोशी, विक्रम भाऊ येरणे, रामसेवक मोरे, अरविंद डोळे, प्रा.सुग्रीव गोतावळे, महेश देवकते, प्रवीण एरमे, हे असणार आहेत.
या आरोग्याला शिबिरात तज्ञ डॉक्टर डॉक्टर कपिल गेडाम मेंदू रोग तज्ञ, डॉक्टर समृद्धी वासनिक बालरोग तज्ञ चंद्रपूर, डॉक्टर श्वेता गेडाम प्रसुतीतज्ञ स्त्री रोग तज्ञ, डॉक्टर कुलभूषण मोरे जनरल फिजिशियन आयुर्वेद तज्ञ, डॉक्टर प्रदीप मंडल हृदयरोग मधुमेह तज्ञ, डॉक्टर नंदिनी मोरे स्त्रीरोग व होमिओपॅथी तज्ञ हे उपस्थित राहणार आहेत.
हृदयरोग संबंधित आजार, ईसीजी, बीपी, शुगर ,तपासणी व उपचार थायरॉईड, आजार उपचार, मूत्र विकार संबंधित उपचार, झोपेची विकार, लकवा, मिर्गी ,फिट, निराश्य शरीरात मुंग्या, दारू विषयी मुक्ती, पचनक्रियेतील उपचार, ऍसिडिटी, आम्लपित्त पोटाचे विकार ,मुतखडा मूळव्याध संधिवात आमवात, सध्याचे दुखणे,सर्दी खोकला, ताप डेंगू मलेरिया त्वचा विकार व खाज मासिक पाळीतील संबंधित आजार गरोदर माताची तपासणी स्त्रियांचे आजार बालकांचे आजार या तपासण्या करण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अर्थ फाउंडेशनचे डॉक्टर कुलभूषण मोरे, डॉ नंदिनी मोरे, मनीषा मोरे, समाधान निकाळजे, आचल मोरे, गणेश ढगे, शत्रुघन मोरे, जगदीश मोरे, साईनाथ मोरे, माधव भालेराव, अक्षय सूर्यवंशी, यांनी केले आहे.

460 Views
बातमी शेअर करा