KINWATTODAYSNEWS

१२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची जय्यत तयारी सुरू. माजी आमदार प्रदीप नाईक यांना १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे निमंत्रण.

किनवट : दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी देखील किनवट येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजन दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले आहे. या वर्षी होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची लगबग व जय्यत तयारी सर्वीकडे पाहण्यास मिळत आहे. मग ते भिंती वरील पेंटींग असो, अॅटो व गाड्यावरील बॅनर व पोस्टर असो, किंवा फेसबुक व व्हाट्सअॅप अशा सोशल नेटवर्किंग साइटवरील पोस्ट असो, सध्या सर्वीकडेच १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद ची तयारी पाहण्यास मिळत आहे.
किनवट माहुर विधानसभेचे माजी आमदार प्रदीप नाईक काल दिनांक १४ डिसेंबर रोजी किनवट आले असता, १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद च्या टिम नी प्रदिप नाईक यांची भेट घेऊन त्यांना दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे निमंत्रण दिले. यावेळी प्रदिप नाईक यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस चे करपुडे पाटील व किनवट चे माजी नगराध्यक्ष साजिद खान यांना देखील निमंत्रण देण्यात आले. यावेळी १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजक राजेंद्र शेळके यांच्या सोबत, निखिल वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, राजु नरवाडे, राहुल चौदंते, दत्ता भालेराव, राजु गजभारे, रवी सुर्यवंशी,‌ डीके उमरीकर, अरविंद मुनेश्वर, दिपक कांबळे इत्यादी उपस्थित होते.
प्रदीप नाईक यांना निमंत्रण दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना १२ व्या जागतिक बौद्ध धम्म परिषद चे आयोजक राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, या वर्षी ची जागतिक बौद्ध धम्म परिषद खुप आगळी वेगळी करण्याचा प्रयत्न चालु आहे व तसेच टेलीव्हीजन वरील प्रसिद्ध गायकांना या धम्म परिषद ला आमंत्रण दिले आहे, तरी सर्व बौद्ध बांधवांनी आपापल्या परीने होईल त्या प्रकारे या जागतिक बौद्ध धम्म परिषद चा प्रसार व प्रसार करावा आणि दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्व बौद्ध बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राजेंद्र शेळके, संयोजक निखिल वाघमारे व सर्व टिमद्वारे करण्यात आले.

53 Views
बातमी शेअर करा