KINWATTODAYSNEWS

खासदार हेमंत पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय स्तरावर निबंध स्पर्धेचं आयोजन

किनवट : शालेय विद्यार्थ्यांचा वैचारिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय स्तरावर नांदेड जिल्हा अंतर्गत हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट, माहूर आणि हदगाव, हिमायतगनर तालुक्यात खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
स्पर्धेचे विषय : १) मोबाईल शाप की वरदान , २) माझ्या स्वप्नातील शाळा व ३) प्रदूषण एक समस्या हे असून स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे : कोणत्याही एका विषयावर निबंध स्वहस्ताक्षरात लिहावा, निबंध २५० शब्दांपेक्षा जास्त असावा, स्पर्धेचे शीर्षक लिहून त्याखाली आपण निवडलेला निबंधाचा विषय टाकावा , जिल्हापरिषद व अनुदानित शाळेतील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी मुख्याध्यापकांच्या निगराणी खाली निबंध स्पर्धा घ्यावी, प्रत्येक शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे निबंध मुख्याध्यापकांनी केंद्र शाळेवर दि. २० डिसेंबर २०२२ रोजी पाठवावे. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील , केंद्र शाळेवर प्राप्त झालेल्या निबंधांमधून केंद्रप्रमुख यांनी केंद्रातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे निबंध व शाळा स्तरावरून प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी २४ डिसेंबर २०२२ रोजी तालुकास्तरावर पाठवावे , तालुकास्तरावर प्राप्त झालेल्या निबंधांमधून तालुका निबंध स्पर्धा समन्वयकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून जिल्हा समन्वयक यांच्याकडे २६ डिसेंबर २०२२ पर्यंत पाठवावे,  प्रत्येक स्तरावर इयत्ता चौथी किंवा पाचवी च्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले नसल्यास त्यांच्यातून प्रोत्साहनपर एका निबंधाची निवड करावी व पुढे पाठवावे, तालुकास्तरावर पारितोषिके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षकां समवेत खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल.
       हिंगोली लोकसभा स्तरावरील पारितोषिके : प्रथम बक्षिस १००००, द्वितीय बक्षिस ७००० व तृतीय बक्षिस ५०००. तालुकास्तरावरील पारितोषिके : प्रथम बक्षिस ३०००, द्वितीय बक्षिस २०००, तृतीय बक्षिस १०००, प्रोत्साहनपर बक्षिस ७०० असे ४ बक्षिस असतील
         जिल्हापरिषद व शासन अनुदानित शाळेतील विद्यार्थी स्पर्धेस पात्र राहतील. निबंध स्पर्धा दरम्यान अंतिम निर्णय आयोजकांचा राहील. स्पर्धेदरम्यान आलेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा समन्वयक /हिंगोली लोकसभा निबंध स्पर्धा समन्वयक : दत्ता पडोळे (८६९८७५७४७३ /८६६८२७७५७४) यांच्याशी संपर्क साधावा. किनवट तालुका निबंध स्पर्धा समन्वयक : उत्तम कानिंदे (९४२१७५८०७८), माहूर तालुका निबंध स्पर्धा समन्वयक : शेषेराव पाटील (७०२०४८८६७६), हदगाव तालुका निबंध स्पर्धा समन्वयक : गुणवंत काळे (९१७५१८५००५ ) व हिमायतनगर तालुका निबंध स्पर्धा समन्वयक : नाथा गंगुलवार (९४२३५१०७९१) असे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

99 Views
बातमी शेअर करा