तालुका /प्रतिनिधी: किनवट तालुका पत्रकार संघाची दिनांक 12 /12/ 2022 रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली असून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्षपदी जगदीश सावनपेल्लीवार तर सचिव पदी रविराज कानींदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मराठी पत्रकार परिषदेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार अर्पण करून सभेस सुरुवात करण्यात आली.
दरम्यान माजी अध्यक्ष स्व. शंकरराव भरकड,स्व. किशनराव किनवटकर, स्व. रमेश कसबे व स्व. नितीन मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
उपाध्यक्ष सुरेश कावळे, कोषाध्यक्ष मधुकर अनेलवार, सहसचिव संतोष अनंतवार, सदस्य अजय कदम, बाबू नेमानीवार तर सल्लागार म्हणून विजय जोशी, एडवोकेट मिलिंद सरपे, एडवोकेट सुनील येरेकर, बी.एल.कागणे यांची निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे विठ्ठलराव नाईक, पत्रकार विलास आडे, अंकुश भालेराव यांची उपस्थिती होती.
किनवट तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जगदीश सावनपेल्लीवार तर सचिव पदी रविराज कानींदे यांची निवड
98 Views