KINWATTODAYSNEWS

किनवट तालुक्यातील सीमावर्ती भागातील22 ते 23 गावे तेलंगणा राज्यात जाण्याच्या विचारात

किनवट/प्रतिनिधी: गावात मूलभूत विकासाच्या योजना मंजूर होत नसल्याने किनवट तालुक्यातील सीमावर्ती भागातील22 ते 23 गावे तेलंगणा राज्यात जाण्याच्या विचारात आहेत. त्या दृष्टीने ग्रामसभेत ठराव मंजूर करणार असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते बाळू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की किनवट तालुक्यातील दिग्रस, थारा, डोंगरगाव, पिंपळगाव खु.,सिंगरवाडी, दहेगाव, पाटोदा, कांचली ,मांडवा, आप्पारावपेठ, नागपूर झळकवाडी धानोरा बे, दयालधानोरा, कोसमेट, कुपटी खुर्द, कुपटी बुद्रुक, नांदगाव ,करंजी, पांगरी, मलकवाडी इत्यादी 22ते 23 गावे तेलंगणा राज्याच्या सीमेवर असूनही गावे अद्यापही विकासकापासून दुर्लक्षित आहेत. या गावात शासनाच्या कोणत्या योजना मंजूर होत नसल्याने नागरिकांना गैरसाईचा सामना करावा लागतो. गावातील रस्ते नाल्या पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध होणे दुरापास्त बनले आहे. 15वा वित्त आयोगाचा निधी वगैरे कोणत्याही योजनेतून या गावांना निधी मिळत नाही. स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी सीमावरती भागातील गावाकडे लक्ष देत नसल्याने व प्रशासनाकडे वारंवार येथे निवेदन सादर करून सुद्धा विकास योजना मंजूर होत असल्याने नाईलाजास्तव आम्ही तेलंगणा राज्यात जाण्याचा विचार करत असून त्या दृष्टीने ग्रामसभेत ठराव घेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पुढील सहा महिन्याच्या कालावधीत सीमावरती भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्यात तसेच गाव विकासाचा निधी मंजूर करावा अशी त्यांची मागणी असून मागणीची पूर्तता न झाल्यास तेलंगणा राज्यात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

399 Views
बातमी शेअर करा