किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा आज रोजी सत्ताधारी पक्ष असून तळागाळातील सर्वसामान्य पर्यंत या पक्षाची ध्येय धोरणे अथवा विचार घेऊन जाण्यासाठी किंबहुना त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष वरिष्ठाच्या आदेशाने कमालीची चळवळ किनवट/ माहूर तालुक्यामध्ये राबवत आहे त्याचाच एक भाग म्हणून वयाचे 20 ते 25 वर्ष समाजसेवा तथा राजकारण त्यांच्या मूळ रक्तात भिनलेले आहे असे व्यक्तिमत्व जे आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवलेले असे श्री बबनरावजी वानखेडे यांची भाजपा तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे
याप्रसंगी लोकनेते आमदार भिमरावजी केराम साहेब, भारतीय जनता पार्टि नांदेड जिल्हाध्यक्ष गोजेगावकर साहेब, तालुकाध्यक्ष संदिपभाऊ केंद्रे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा किनवट तालुका उपाध्यक्ष पदाची जवाबदारी देऊन काम करण्याची संधी दिली आहे..
सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे .
किनवट तालुका भाजपा उपाध्यक्षपदी बबन वानखेडे यांची नियुक्ती
37 Views