KINWATTODAYSNEWS

अतिरिक्त सत्र न्यायालय न दिल्यास तेलंगणात जाणार

किनवट (तालुका प्रतिनिधी): जिल्हा मुख्यालयापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट येथे अतिरिक्त सत्र न्यायालय द्यावे, ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण करावी, यासाठी किनवट अभिवक्ता संघाने ६ डिसेंबर रोजी कामबंदची हाक दिली आहे. दखल न घेतल्यास किनवट तालुक्याचा तेलंगणात समावेश करण्याचा ठराव घेतला जाणार असल्याचे अभिवक्ता संघाने स्पष्ट केले किनवट तालुका मुख्यालय हे जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अंदाजे दीडशे किलोमिटर च्या वर आहे म्हणून किनवट न्यायालयात कामबंद आंदोलन केले .

तसेच संपूर्ण किनवट माहूर तालुक्यामध्ये सदर मागणीसाठी जन आक्रोश म्हणजे जन आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही किनवट मधील सर्व ग्रामपंचायती तसेच माहूर मधील सर्व ग्रामपंचायती तसेच किनवट नगरपरिषद तसेच माहूर पंचायत समिती यांनी लवकरच शासनाकडे संबंधित ठराव सादर करावा असे जनसामान्य व्यक्ती मधून बोलल्या जात आहे. जिल्हा अतिरिक्त न्यायालय स्थापन होणे म्हणजेच शिवनी पासून ते सारखणी खंबाळा पर्यंतच्या जनसामान्याला न्याय प्रणाली ही सुबक होईल तसेच दीडशे किलोमीटरचे पायपीट येणे जाणे हे वाचेल व लवकरच किनवट जिल्हा निर्मितीचे काम सुकर होईल प्रथमतः जिल्हा न्यायालयाची उभारणी करणे म्हणजे संपूर्ण किनवट माहूर तालुक्याचा विकास आहे तसेच किनवट माहूर तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधी सुद्धा या मागणीसाठी जोर धरत आहेत जिल्हा न्यायालय यावे ही सर्व स्तरातून मनोमनी इच्छा आहे त्यासाठी प्रशासकीय स्तरावरून राजकीय स्तरावरून, आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून व शैक्षणिक क्षेत्रातून मागणी होत आहे शासनाने किंबहुना संबंधित प्रबंधक उच न्यायालय मुंबई यांनी दखल घेऊन तात्काळ मागणी पूर्ण करावी. व निर्माण होणारा कायदेशीर पेच प्रसंग टाळावा न्यायासाठी संघर्ष करावा लागतो ही बाब आदर्श शासनास म्हणजे गतिमान शासनास न झेपणारी आहे गतिमान शासकीय कारभारास न परवडणारी आहे त्यामुळेच अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापन होणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची सोय होणे आहे..
यावेळी अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. अरविंद चव्हाण, उपाध्यक्ष अॅड. पी एच खुरेशी, सचिव अॅड. पंकज गावंडे यांच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती अॅड. पंकज गावंडे यांनी दिली.

दीडशे किलोमीटर अंतरावर असलेला तालुका असून, हा तालुका विशेषतः पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत येतो. निगडित कामकाजासाठी दीडशे किलोमीटरचे अंतर गाठावे लागते…

59 Views
बातमी शेअर करा