किनवट प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवराया बाबत चुकीचे विधान केल्याने तीव्र पडसाद देशभर उमटले असून किनवट येथेही शिवप्रेमींच्या भावनांना उद्रेक गुरुवारी झाला.संभाजी ब्रिगेडच्या वतीने किनवट शहरातील जिजामाता चौक येथे दि.८ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले.
विकृत मनोवृत्तीचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून बडतर्फ करावे अशी मागणी अनेकांनी केली याबरोबर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व खासदार रावसाहेब दानवे व आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे विधान केल्याने जाहीर निषेध केला.
मागणीचे निवेदन किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद आरसोड तालुका अध्यक्ष सचिन कदम विधानसभा अध्यक्ष शिवानंद पवार,मंगेश जाधव,संतोष अडकीने,प्रा.शिवानंद बोकडे,आकाश इंगोले,सुशील कदम,अविनाश शिंदे,पुंडलिक सोरटे,घनश्याम कऱ्हाळे,प्रकाश गोरे,समाधान उटकर,रितेश मंत्री,पत्रकार सुरेश मस्के,किरण ठाकरे,गौतम येरेकार,अमोल पवार, विक्रम पवार, सदानंद पांचाळ, विशाल पिंनमवार, ओंकार इंगळे,आदींसह संभाजी ब्रिगेडचे शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती अनिल पाटील कऱ्हाळे,शिवसेनेचे मा.तालुका प्रमुख राम पाटील कोरडे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
दरम्यान,रास्ता रोकोमुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.