किनवट ता.प्र दि १२ किनवट तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे लांबल्या असुन आता दुसरी लाट देखिल निवळल्याने पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे यामध्ये सर्वाधिक प्रतिक्षित निवडणुक म्हणून जिल्हा परिषद बोधडी गटाची पोटनिवडणुक आहे कारण तेथिल जिल्हा परिषद सदस्या श्रीमती दहिफळे यांचे काहि दिवसापुर्वी निधन झाल्याने ती जागा रिक्त झाली होती त्यानंतर किनवट तालुक्यातील गोकुंदा हि शहराला लागुन असलेली मोठी ग्राम पंचायत असुन या ग्रामपंचायती मध्ये लवकरच प्रशासकाची नियुक्ती शासनाकडुन होणार आहे कारण या ग्राम पंचायतीची मुदत संपलेली आहे.
या सोबतच बोधडी, घोटी, कमठाला, कोठारी सि. , मांडवी, मांडवा या प्रमुख ग्राम पंचायती मध्ये निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे किनवट तालुक्यातील मोठ्या व तुल्यबळ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येथे होतात येथिल दोन्ही बाजुचे विरोधक हे तगडे असुन येथिल निवडणुकीच्या काळात प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था प्रस्थापिक राखण्यास कस लागणार आहे.
जिल्हा परिषद बोधडी गट व बोधडी ग्राम पंचायत येथिल निवडणुक जर सोबत लागली तर येथिल निवडणुक हि अत्यंत चुरसीची होनार आहे तर याठीकाणी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांचे तालुक्यातील नेतृत्व करत असलेल्या पदाधिका-यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यामुळे येथिल निवडणुक सुध्दा अत्यंत चुरशीची होणार आहे. तर गोकुंदा ग्राम पंचायत हे सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांच्या ताब्यात असली तरी तालुक्यातील बदललेले राजकिय समिकरण पाहता गोकुंदा येथिल निवडणुक देखिल अत्यंत चुरशीची ठरणार आहे. तर घोटी, कमठाला येथिल भाजपा व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पदाधिकारी समोरा समोर येणार असल्याने निवडणुकीतील चुरस अत्यंत शिगेला जाणार आहे.
मांडवी, कोठारी सि येथिल राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार असुन येथे भाजपाला नुकसान होईल असे काही नसले तरी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आपली सत्ता साबुत राखणे हे त्यांच्या पदाधिका-यांसाठी प्रतिष्ठा पणाला लावणे ठरणार असुन तर भविष्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे भविष्य याव्दारे ठरले जाणार आहे.
किनवट शहरापासुन जवळच असलेल्या मांडवा येथे मागील विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने खुप ताकद लावुन देखिल त्यांना अपेक्षित मते न मिळाल्याने येथिल ग्राम पंचायत निवडणुक हि कोणत्या दिशेने जाते व राजकारणातील कोणती कोलांट उडी कशी मारावी हे नेहमी दाखवणारे गाव यावेळी कोणती कोलांट उडी मारुन दाखवते हे देखिल पाहणे अत्यंत उत्सुकतेचे राहणार आहे.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या कारणाने लांबलेल्या या निवडणुका व्हाव्यात असे राजकारण्यांना वाटत असले तरी परिस्थितीमुळे त्या होऊ शकल्या नाही अशा स्थितीत जर प्रशासनानाने निवडणुका जरी जाहीर केल्या तरी कोरोना विषाणुच्या परिस्थितीमुळे प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन नागरीकांनी करणे अत्यंत आवश्यक आहे ह्या नियमांचे पालन केले तरच नागरीकांना सर्वसामान्य जिवन जगण्याचा आनंद घेता येणार आहे.
किनवट तालुक्यातील राजकारण्यांना लागले ग्राम पंचायत निवडणुकीचे वेध
178 Views