किनवट/ तालुका प्रतिनिधी : किनवट काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत माधव रेड्डी यांची फेरनिवड करण्यात आली असून नांदेड येथे त्यांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, नांदेड जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर व पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
किनवट तालुक्यात काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव रेड्डी यांची सुपुत्र के. सूर्यकांत रेड्डी केल्या पाच वर्षापासून किनवट तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची किनवट तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे किनवट तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नक्कीच किनवट तालुक्यात काँग्रेस पक्षास बळकटी मिळेल. त्यांच्या चाहत्याकडून त्यांच्यावर अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे.
किनवट काँग्रेस तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत माधव रेड्डी यांची फेरनिवड
276 Views