जिवती/प्रतिनिधी: केकेझरी येथील महावितरणचे वाकलेले खांब व लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
देविदास पवार यांच्या घरापासून उद्धव गायकांबळे यांच्या घरापर्यंत वीज वाहक तार हे हातांच्या उंचीपर्यंत येऊन लोंबकळत आहेत व हवेमुळे हेलकावे खात आहेत त्यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या गावकर्यांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतोय..व तार हवेने एकमेकांना घासून वीज सतत खंडित होत आहे..
त्यामुळे या संदर्भात अधिकाऱ्यांना कळवूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गावकरी संतापले आहेत..
वास्तविक पाहता पावसाळा लागण्यापूर्वी प्रत्येक विधुत उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात तारा,खांब याचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तारा बदलणे,झुकलेले खांब सरळ करणे, लोंबकळलेल्या तारा सरळ करणे तुटलेल्या तारा जोडणे ही कामे प्राधान्याने करणे गरजेचे आहे परंतु याकडे महावितरण अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे…