KINWATTODAYSNEWS

आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही वनपरिक्षेत्र अधिकारी,किनवट यांच्यावर राहील- स्त्रिया वन कामगार

किनवट/प्रतिनिधी: वन कामगारांनी काल वनपरिक्षेत्र कार्यालयात, किनवट, उपविभागीय कार्यालय किनवट व तहसीलदार कार्यालय किनवट येथे युएलपी 19 अभिलेख 2022 या प्रकरणातील कामगारांना सेवेत व वेतन बदल न करणे व रोपवाटिका लोणी मध्ये 8/ 2/2022 पासून कामावर चालू आहेत तरी आमची पगार मिळणे बाबतआशा आशयाचे निवेदन सादर केले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी वनपरिक्षेत्र कार्यालय किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, न्यायालय आदेशातील सर्व कामगार आपले परिक्षेत्र अंतर्गत कार्यरत कामावर चालू आहेत. आमच्या सेवेत व वेतनात कसलीही बदल करू नये असा आदेश माननीय न्यायालयाचा आहे. आमच्या सेवेत आणि वेतनात बदल करू नये बदल केल्यास मा. न्यायालयाचा अपमान करत आहात असे होईल बदल केल्यास आम्हाला परत न्यायालयात धाव घ्यावी लागेल. विनंतीपूर्वक विनंती करण्यात येते की आमची थकीत पगार देण्यात यावी. आम्ही सर्व स्त्रिया आमची पगार होईपर्यंत आम्ही सर्व कामगार वनपरिक्षेत्र कार्यालयातच थांबणार आहोत . त्या दिवसात आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही वनपरिक्षेत्र अधिकारी,किनवट यांच्यावर राहील करिता माहितीस्तव सविनय सादर.या निवेदनावर भोजू रामा जाधव, साळूबाई प्रल्हाद काळे, कौशल्याबाई प्रल्हाद परचाके, शकुंतला निवृत्ती मगरे, मालाबाई गोपीनाथ तलांडे ,सविता मारुती कोटनाक, नर्मदाबाई आनंदा किनाके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

252 Views
बातमी शेअर करा