KINWATTODAYSNEWS

राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय कबड्डी स्पर्धेत प्रथम

जालना : जिल्हातील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलित ता.बदनापूर,जि.जालना.
राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी, ता.जि.जालना.या शाळेचे जालना-क्रीडा व युवा सेवा संचालनालय यांच्या वतीने सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना विद्यार्थ्यांनी १७ वर्ष वयोगटातील तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेतील कबड्डी खेळ प्रकारात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकविला.यामुळे हे विद्यार्थी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पाञ ठरले आहेत याबद्दल त्यांचा शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. परमेश्वर गरबडे साहेब व शाळेचे सचिव श्रीमती.लताताई गरबडे मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थांचे व क्रीडा शिक्षक एल.बी.जाधव यांचे अभिनंदन केले पुढील जिल्हास्तरीय खेळासाठी शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.परमेश्वर गरबडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते बोलताना म्हणाले की शहारात रूग्णालयांऐवजी खेळाच्या मैदानांची संख्या वाढली,तर आजार दूर पळतील.

आपल्या दैनंदिन व्यापातूना खेळासाठी वेळ काढलाच पाहिजे, व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळवा व अनेक उत्कृष्ट व चांगल्या खेळाडुंना आपल्या खेळाकडे पुरेसे लक्ष देऊन आपले शिक्षणही शाळेत पुर्ण करता येईल असेही ते म्हणाले व विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक एल .बी.जाधव यांचे भरूभरून कौतूक केले व अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित जालना टाॅईम्स संपादक खाॅन साहेब,पञकार नागवे साहेब व गावातील प्रतिष्ठीत नागरीक युवामिञ मंडळ गावातील नागरीक पालकवर्ग,शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे.तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते श्रीमती एस.आर.कुलकर्णी,वाय.बी.मदन,डी.एन.सोनकांबळे,पी.पी.नागरे,श्रीमती.ए.बी.देशपांडे,एल.बी.जाधव,आर.एस.ठाकरे,एस.बी.राऊत,श्रीमती.एम.ए.खरात,आदिची उपस्थिती होती सर्वांना विद्यार्थ्यांचे कौतूक केले व अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या…!

162 Views
बातमी शेअर करा