KINWATTODAYSNEWS

टिपू सुलतान हे राष्ट्रीय बलीदानाचे प्रतिक – शेख सुभान अली हिंदू मुस्लिम एक्य हेच आमचे प्रगतीचे निष्कर्ष, धार्मिक सलोखा असेल तर देश महासत्ता बनेल – मधुकर महाराज बारूळकर

मुखेड : शहारात २९ रोजी ह. टिपू सुलतान जयंती उत्सव समीती मूखेड च्या वतीने टिपु सुल्तान जयंती व सविधान दिन निमित्त व्याख्यानांचा कार्यक्रम संपन्न व्याख्यानाच्या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करून झाली, येणाऱ्याया सर्व मान्यवरांना समितीच्या वतीने संविधानाची टिपू जिवनावर असलेली पुस्तिका सत्कार म्हणून देण्यात आली, तसेच भारतीय संविधानाची उद्देशिकाचे वाचन खाजा धुंदी यांनी, तर शाळेतील चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रस्ताविक भाषण शिवाजी गेडेवाड यांनी केले, या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार पत्रकार महताब शेख यानी केले. उदघाटक श्री मधुकर महाराज बारूळकर यांनी प्रत्येक घराघरात देशभक्तीचा व मानवतेचा टिपू सुलतान घडवा, हिंदू मुस्लिम एक्य हेच आमचे प्रगतीचे निष्कर्ष असू शकतात, धार्मिक सलोखा असेल तर देश महासत्ता बनेल हे ठणकावून सांगितले, पुढे कार्यक्रमाचे अध्यक्ष भ रेवतबोद्धी यानी आपल्या शैलीत बोलले देशात काही जन दंगली करुन जाती जातीत भांडणे लावण्याचे कामे करीत आहेत, आपन ह्या बाबी विचारात घेऊन एकच धर्म मानवता धर्म आमलात आणुन मानव घडणे व घडवणे तेंव्हाच आपले संविधान व देश वाचेल.

पुढे सुभाण अली सर म्हणाले स्वातंत्र्य वीर शहीद टिपू सुलतान हे राष्ट्रीय बलीदानाचे प्रतिक आहेत ते धर्म सहिष्णू राजे होते. त्यांनी १५६ मंदीरांना देणग्या दिल्याचा पुरावा आज ही मैसुर गेझेटीयर मध्ये उपलब्ध आहे. टिपू सुलतान खरा धर्म सहिष्णू होता. इंग्रजांनी टिपू ला बदनाम केले टिपू सुलतान च्या महलाच्या ४ ही बाजुने श्रीवेंकटरमना, श्रीनिवास, श्रीरंगनाथ चे मंदीर या गोष्टीचा स्पष्ट पुरावा आहे की टिपू सुलतान धर्म सहिष्णू होते हिंदू प्रजेवर प्रेम करणारे होते असे मत टिपू सुलतान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दंगा मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख शेख सुभान अली यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय प्रतीक राष्ट्र निर्माणाची प्रेरणा असतात आणी स्वातंत्र्य वीर टिपू सुलतान एकमेव सर्वात पहले शहिद आहेत जे इंग्रजा विरुद्ध लढताना रणांगणात शहिद झाले आहेत म्हणून स्वातंत्र्य वीर टिपू सुलतान यांची जयंती राष्ट्रीय बलीदानाची प्रेरणा म्हणून साजरी करायला हवी, संविधानाच्या मूळ प्रतीत त्यांचे छायाचित्र समाविष्ट करण्यात आले आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रतच्या पृष्ठ १४४ अध्याय १६ मध्ये स्वातंत्र्य वीर टिपू सुलतानचे छायाचित्र आहे. जि विचारधारा संविधानाला वीरोध करते तीच विचारधारा स्वातंत्र्यवीर टिपू सुलतान यांचा विरोध करते आणी जो कोणी टिपू सुलतानला विरोध करत आहे तो संविधानाच्या मूळ प्रतीच्या अस्तित्वालाच विरोध करत आहे आणि म्हणून तो राष्ट्रद्रोही संबोधला जावू शकतो, म्हणून कोणीही अज्ञानपोटी ही राष्ट्रीय प्रतिके, संविधान यांचा विरोध करता कामा नये असे ते म्हणाले. समाजात बंधुभाव निर्माण करून सामाजिक एकता आणी राष्ट्रीय एकात्मता सशक्त करणारा अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन मुखेड येथील टिपू सुलतान जयंती उत्सव समिती यांनी केले, तर या कार्यक्रमाला दिलीप पाटील बेटमोगरेकर, दशरथराव लोहबंदे, सय्यद एफ एम, गौतम काळे, ईनामदार जकरीया, नासेरखा पठाण, संतोष बोनलेवाड, सदाशिव पाटील, शिवाजी गेडेवाड, गोविंद डुमणे, अनिल सिरसे, शौकत होनवडजकर, उत्तम बनसोडे, शौकत पठाण, आलावोदीन मुल्ला, हाजी हैदरसाब, अँड रहीमखान, शेख मैनोदीन, अ. करीमसाब धुंदी, बंटी सोनकांबळे, हाजी सय्यद साबेर पठाण, सचिन पा. इंगोले, विजय कोतापले, सचिन श्रीरामे, लखन गायकवाड, पठाण अनवरखा, अँड आशिष भारदे, संतोष बनसोडे, शंकर श्रीरामे, अहेमद बेळीकर, पत्रकार मुस्तफा पिंजारी, पत्रकार जलील पठाण, मोसीन कोतवाल आदी सह तालुक्यातील सर्व समाजिक संघटनाचे, राजकीय पदअधिकारी, पत्रकार, कार्यकरते, व मूखेड शहरातिल नागरिक व टिपू सुलतान जयंती उत्सव समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

63 Views
बातमी शेअर करा