KINWATTODAYSNEWS

किनवट (गोकुंदा) आजपासून दोन दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजवंत मुलांची 2D इको तपासणी व ह्रदयावर मोफत शस्त्रक्रिया

नांदेड, दि. २८ (वार्ताहार) – खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किनवट तालुक्यातील गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात आज मंगळवार (दि.२९) पासून दोन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात शून्य ते १८ वयोगटातील गरजवंत मुले व मुलींची 2D इको तपासणी व ह्रदयावर मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त गरजवंत रुग्णांनी नाव नोंदणी करुन शिबिराचा लाभ घ्यावा असे खासदार हेमंत पाटील यांनी आवाहन केले आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, वाडिया हॉस्पिटल मुंबई आणि राजेंद्र अग्रवाल (रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर २०२१-२२ ) यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मंगळवार (दि.२९) आणि बुधवारी (दि.३०) गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचे आय़ोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक वाढदिवस अविस्मरणीय करण्याचा खासदार हेमंत पाटील यांचा नेहमीच प्रयत्न असतो. यापूर्वी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड दक्षिणचे आमदार असताना वाढदिवसाला हार, तुरे, शाल, श्रीफळ यावर वायफळ खर्च न करता जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक बुट जोडी भेट म्हणून द्यावी असे आवाहान करत मतदार संघात मी अनवाणी नावाचा उपक्रम राबत जिल्हा परिषदेच्या शाळेतील ४० हजार बालकांना शुज व स्वाक्सचे वाटप करुन हा वाढदिवस साजरा केला होता. त्यांचा हा उपक्रम सर्वमाध्यमांनी आदर्श उपक्रम म्हणून त्यास विशेष प्रसिद्धी दिली होती. यंदा देखील खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील शुन्य ते १८ वयोगटातील मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी व ह्रदयावर शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे.
आज सकाळी दहा वाजता या शिबिराची सुरुवात होत असलेल्या आरोग्य शिबीरात जास्तीत जास्त गरजवंत लाभार्थ्यांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे खासादार हेमंत पाटील यांनी आवाहन केले आहे. या कार्यक्रमास खासदार हेमंत पाटील यांच्यासह आमदार भिमराव केराम व इतर मान्यवरांच्या उपस्थिती हे आरोग्य शिबीर पार पडणार राहणार आहे.

45 Views
बातमी शेअर करा