किनवट : स्वातंत्र्य सैनिकांच्या वीरगाथा घराघरात पोहचविणे तसेच विद्यार्थ्यांना बोलण्याचे धाडस, आत्मविश्वास, सभाधीटपणा , विषय प्रतिपादन, हावभाव इत्यादी कौशल्य आत्मसात व्हावेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्राप्त व्हावे, यासाठीच या भाषण स्पर्धा’ आहेत. असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (प्रा) डॉ. सविता बिरगे यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण विभाग पंचायत समिती, किनवटच्या वतीने हुतात्मा स्मारक इस्लापूर येथे “तालुकास्तरीय भाषण स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. गट विकास अधिकारी सुभाष धनवे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शारदा अनिल शिनगारे, उपसरपंच निर्मला बालाजी दुरपडे, समग्र शिक्षा अभियानचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे, कंधारचे गट शिक्षणाधिकारी बालाजी शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, मनीषा बडगिरे, विस्तार अधिकारी (पं) व्ही. बी. कांबळे, ग्राम विकास अधिकारी शरद गर्दसवार, ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महानायकांच्या व हुतात्म्यांच्या प्रतिमास पुष्पार्पूण ज्ञानदीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
आयोजक गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल कांबळे यांनी आभार मानले. प्रा. डॉ. पंजाब शेरे, डाॅ. महेंद्र नरवाडे व कौन बनेगा करोडपती ? फेम अर्चना इटकरे (हदगाव) यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील यशवंत : गट- 1 ला (इयत्ता 1 ली ते 6 वी) : हिमायतनगर गट शिक्षणाधिकारी रविंद्र जाधव प्रायोजित प्रथम बक्षीस – कोमल मनोज राठोड (जि.प.प्रा.शा. सारखणी), शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड प्रायोजित व्दितीय बक्षीस- स्तुती नितीन चाडावार (ज्ञानज्योती पोदार लर्न्स स्कूल बेंदीतांडा), श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली व हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालय कनकी प्रायोजित तृतीय बक्षीस- हर्षदा प्रेम आडे (जि.प.प्रा.शा. परोटीतांडा) आणि गट: 2 रा (इयत्ता 7 वी ते 10 वी): केंद्र प्रमुख शंकर वारकड प्रायोजित प्रथम बक्षीस – साक्षी सुनिल सेपुरवार (जि.प.हा. शिवणी), केंद्र प्रमुख सुभाष मोरे प्रायोजित व्दितीय बक्षीस- मयुरी मारोती बुटले (जि.प.हा. कोसमेट), मुख्याध्यापक बाळासाहेब गुंड प्रायोजित तृतीय बक्षिस- प्रज्ञाचक्षू भूमिका सचिन जाधव (जि.प.हा. बोधडी बु.)
याप्रसंगी उप शिक्षणाधिकारी पदोन्नती बद्दल मुख्याध्यापक बाळासाहेब गुंड व महात्मा फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराबद्दल मुख्याध्यापक जी.जी.पाटील यांचा शिक्षणाधिकारी डॉ. बिरगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख विश्वनाथ चाकोते, अरुण पळसपुरे, सुभाष फोले, अनिरुद्ध राठोड, यशवंत बि-हाडे, संजय जाधव, प्राचार्य एम.एम.मुंडे, प्राचार्य डी. एल. भोसले, श्रीमती के. एल. गुट्टे, रेखा पांचाळ, वंदना फोले आदिंनी परिश्रम घेतले.
शाळास्तराववर झालेल्या स्पर्धेतून दोन्ही गटातून प्रथम आलेले स्पर्धक केंद्र स्तरावर, तेथील प्रथम स्पर्धक बीट स्तरावर व तालुक्यातील एकूण आठ बीट मधील पहिल्या गटातून आठ व दुसऱ्या गटातून आठ असे सोळा स्पर्धक तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्वातंत्र्य सैनिकांच्या वीरगाथा घराघरात पोहचविणेसाठी भाषण स्पर्धेचं आयोजन -शिक्षणाधिकारी(प्रा) डॉ. सविता बिरगे
102 Views