भंडारा ः – पहिला येथे आद्यक्रांतीविर लहूजी साळवे जयंती निमित्ताने भव्य मातंग समाजाचा मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लहू सेने चे प्रमुख संजय कठाळे होते .
प्रमुख अतिथी मा.दिपक वानखेडे , गोंडाणे सर , ढगे सर , जि.प.सदस्या श्रीमती यामीनीताई बांडेकुचे , विकास भुरळे , राजेश मेश्राम , संजीव भांबोरे , उल्हास हरडे , भाले सर ईत्यादि उपस्थित होते .
संजय कठाळे यांनी महामानवा यांच्या प्रतिमेला हारअर्पण करून आणि दिप प्रज्वलीत करून मेळाव्याचे उद्घाटन केले.
कठाळे आपल्या लहूजी साळवे यांनी समाज परिर्तन आणि देशाच्या स्वतंत्र्या साठी लहूजी दोन्ही स्तरावर कार्य केले.
देशा करीता क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सारख्याची फौज निर्माण केली , तर सावित्रीबाईला संरक्षक देवून एक शिक्षिका तयार केली .तर त्यांच्या आखाड्या महात्मा फुले यांनी प्रशिक्षण घेऊन त्यांनी लहूजीला गुरू मानले.
आज ही मातंग समाजाचा भुकेचा प्रश्न, भाकरीचा प्रश्न , निवारा प्रश्न , कामाचा प्रश्न , बेरोजगार युवकांचा प्रश्न सुटलेला नाही,नोकऱ्या मिळणे हा आमचा घटनात्मक हक्क आहे. आम्ही आरक्षणाचा वाटा मागतो , हक्क मागतो , अधिकार मागतो , भिक नाही, तोच सरकार डावलत आहे, मग आरक्षण कोणा साठी आहे ? आरक्षणाचे धोरण कशासाठी ? ज्यांना आरक्षणाचा फायदा झालेला नाही त्यांचे का ?
मातंग समाजावर अन्याय , अत्याचार होत आहे त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरुन संघर्ष करा.
कष्टकरी , वंचित , शोषित , आदिवासी , शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन तिव्र व उग्र आंदोलन उभारा.असे लहू सेने चे प्रमुख संजय कठाळे म्हणाले .
कार्यक्रमाचे संयोजक श्री. सुनील शेंडे ( माजी सरपंच पहिला ) यांनी प्रास्तविक केले , संचालन प्रा. भाले सर यांनी केले .आभार राजेश मेश्राम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करीता सर्व श्री..कवडूजी खंडारे , दवडू खंडारे , भाले सर ईत्यादि
पहिला ( भंडारा ) येथे आद्यक्रांतीविर लहूजी साळवे जयंती निमित्ताने मातंग समाजाचा मेळावा संपन्न
129 Views