KINWATTODAYSNEWS

राष्ट्रवादी युवक कॉग्रेस युवा नेते बालाजी भाऊ बामणे यांची किनवट राष्ट्रवादी युवक ता.अध्यक्षपदी निवड

किनवट ता.प्र दि २० “शरद संवाद यात्रे निमित्त” राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या उपस्थितीत किनवट तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता . आयोजित मेळाव्याला युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गोकुंदा येथिल गोपी किशन मंगल कार्यालयामध्ये आयोजित युवक मेळाव्यापुर्वी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस युवा नेते बालाजी भाऊ बामणे यांच्या नेतृत्वाखाली मौजे चिखली ते गोकुंदा अशी युवकांची मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये सुमारे ३०० युवकांनी सहभाग नोंदवला होता. तर गोकुंदा येथे भव्य पुष्पहार जो कि क्रेन च्या सहाय्याने घालण्यात आला होता.

राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षाचे प्र्देशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित मेळाव्यात किनवट माहुर क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्व आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह संचारला होता. यावेळी ग्रामिण भागातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करतांना प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केंद्र सरकारवर तोफ़ डागली तर मोदी हे नागरीकांना फसवुन खोट बोलुन सत्तेत आल्याचे ही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर अद्यापही काहि भक्त हे १५ लाख रुपये खात्यात येईल या विंवचनेत असुन त्यांनी आता जागे होऊन काम धंदा करण्याची आवश्यक्ता असल्याचे शेख यांनी आपल्या भाष्णातुन स्पष्ट केले तर माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या परभवाने किनवट माहुर तालुक्याने एक मंत्री गमावल्याची खंत हि त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीवर अजित साबळे यांची निवड माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या शिफारसीने करण्यात आली तर बालाजी बामणे यांची निवड राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या किनवट तालुका अध्यक्ष पदी करण्यात आल्याची घोषणा यावेळी प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी केली तर आयोजित कार्यक्रमात युवकांच्या अनेक आघाडी व पदांची नियुक्या करण्यात आल्या. तर ग्रामीण भागातील अनेक युवकांचा प्रवेश हि यावेळी घेण्यात आला. माजी आमदार प्रदिप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ग्रामीण भागातील आदिवासी, कोळी, बंजारा, मुस्लिम यांच्यासह विविध जाती धर्मातील युवकांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी आयोजित मेळाव्यात शरद संवाद यात्रे निमित्त प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्यासह त्यांची संपुर्ण टीम, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची जिल्हा आघाडी, तालुका आघाडी चे पदाधिकारी, टीम मेंम्बर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश राठोड, समाधन जाधव, जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, वैजनाथ करपुडे पाटील, माहुर नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, माजी नगराध्यक्ष साजिद खान, माहुर तालुका अध्यक्ष मेघराज जाधव, बाजार समितीचे सभापती अनिल पाटील, दत्तराम मोहिते, युवक अध्यक्ष राहुल नाईक , मारोती रेकुलवार, जिल्हा परिषद सदस्य मधुकर राठोड, प्रविण म्याकलवार, विशाल जाधव, शिवराम जाधव, कचरु जोशी, गजानन मुंडे पाटील, युवक जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष बंटी पाटील, नगर परिषदेचे गटनेते जहिरोद्दीन खान, नगर परिषदेतील नगरसेवक, गोकुंदा चे उपसरपंच शेख सरु, माजी उपसरपंच शेख सलिम, प्रविण राठोड, मांडवाचे माजी उपसरपंच इरपेनवार, संतोष मेडपेल्लीवार, संतोष मुंडे, महेश तंबाखुवाला, डॉ रोहिदास जाधव, महेश कनकावार, अमोल जाधव, गोविंद धुर्वे,मनोज श्रीरामे,अंबादास चव्हाण, युवा नेते प्रमोद राठोड, पत्रकार जयपाल जाधव, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष ताहेर भाई, ज्येष्ठ पदाधिकारी हसन खान लाला, कृष्णा रेडी, पिंपळगावचे सरपंच श्रीकांत शेडमाके, सदस्य गजानन मंडाडे, चंद्रशेखर पवळे, भारत राठोड, तानसेन , गंगाधर बट्टलवार, युवानेते ज्ञानेश्वर दहिफळे, लक्ष्मण मुंडे, इस्लापुर चे डॉ गंगासागर, सुभाष वानोळे, मनोज राठोड बाळु शेरे, गंगाधर जाधव, कैलास राठॉड कनकी, श्रीनिवास येईलवाड, मुज्जु चाऊस, मिसेवार गजानन, गणेश राठोड सरदारनगर, नईम लकडीवाला, नागनाथ भालेराव, देवराव तिरमनवार, अमित येवतीकर, माजी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुगत नगराळे, पृथ्वीराज आडे, युवानेते अमरदीप कदम पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या ग्रामिण तांडी वाड्यावरील वरिष्ठ ज्येष्ठ, पदाधिकारी, नाईक , प्रधान यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेश संयोजक आदिवासी नेते जयवंत वानोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा नेते बालाजी बामणे यांनी केले.

62 Views
बातमी शेअर करा