शेगांव: द्वेष हिंसा आणि भीती यामधून कोणाचाही विकास होऊ शकत नाही. लोकांना जिंकायचं असेल तर त्यांच्याशी बोला त्यांना ऐकून घ्या त्यांना प्रेम द्या यासाठी रस्त्यावर चालावे लागेल. रस्त्यावर चाललात तर तुम्हाला जनतेचे दुःखी समजतील असा सल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेगाव मध्ये झालेल्या जाहीर प्रचंड सभेत विरोधकांना दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलणे त्यांनी या सभेत टाळले व इतर मुद्द्यावर भर दिला.
भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील अखेरची सभा शुक्रवारी शेगाव मध्ये पार पडली लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत राहुल गांधी यांनी संत गजानन महाराज की जय अशी सुरुवात करत यात्रेतील आतापर्यंतचे अनुभव सांगितले.
यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या टिपणीनंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच हा विषय टाळत त्यांनी “नफरत छोडो” या मुद्याभोवती संवाद साधला.
शेतकरी आत्महत्या करत असतो. त्यांच्या डोक्यावर कर्ज असते परंतु ते आजवर वाऱ्यावर आहेत. या देशातील पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचे मनापासून ऐकले तर त्यांना शेतकऱ्यांची व्यथा कळेल व त्यांना मदत करता येईल असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत होते ते छत्रपती झाले कारण त्यांनी लोकांचा आवाज ऐकला ते महाराष्ट्राचा आवाज आहेत. त्यांना घडविण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केले हे आपणास विसरून चालणार नाही अशा शब्दात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले.
महाराष्ट्रातील संतांच्या नावाचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी संत परंपरेंचा गौरव केला या सर्व संतांनी प्रेमाचा संदेश दिला हाच संदेश घेऊन “भारत जोडो यात्रा” निघाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मी मन की बात करायला आलो नसून तुमचा आवाज ऐकायला आलेलो आहे. भाजपाने घराघरात भांडणे लावली ज्या घरामध्ये द्वेष असतो भांडण असतात त्या घराचे नुकसान होते मग देशात भांडण लावले तर देशाचा फायदा होईल का? असे त्यांनी भाजपाला उद्देशून प्रश्न विचारला. या सभेस लाखोचा जनसमुदाय उपस्थित होता
रस्त्यावर चाललात तर तुम्हाला जनतेचे दुःखी समजतील – काँग्रेस नेते राहुल गांधी ;शेगांव येथे प्रचंड जाहीर सभा
199 Views