KINWATTODAYSNEWS

किनवट येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची 147 जयंती मोठ्या उत्साहात साजरी

किनवट: दि 15 नोव्हेबर रोजी किनवट येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची 147 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व तसेच समाजातील युवा मुलांनी व मित्र परिवारानी मेहेनत करून यशस्वी रित्या पार पाडून दाखवला व आज जरी हे युवा बांधव लोकांच्या नजरेत जरी झिरो असले तरी या जयंतीचे असली हिरो हेच युवा बांधव आहेत.
किनवट – सर्वसामान्यांना केंद्रबिंदु मानत समाजाच्या अखेरच्या घटकांपर्यंत विकास योजना पोहोचविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.मतदारसंघात होणारी कामे गुणात्मक तसेच दर्जेदार व्हावीत,अशी अपेक्षा आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केली. क्रांतिकारक,जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या औचित्याने मंगळवारी दि.१५ शहरातील १०.५१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले.त्याप्रसंगी हु.गोंडराजे शंकरशहा रघुनाथशहा मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष इसाखान होते.व्यासपीठावर नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानीवार,तहसीलदार तथा प्र.मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव,माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार,दिनकर चाडावार,दीपक नेम्मानीवार,सुनील पाटील, के. मूर्ती,इंदुबाई कनाके,साजीदखान यांची प्रमुख उपस्थिती होती.आ.केराम पुढे म्हणाले की,भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना स्वाभिमान, स्वातंत्र्याचा मंत्र दिला,स्वातंत्र्याच्या चळवळीत आदिवासी बांधवांचे योगदान मोलाचे आहे.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण होत आहे.त्यांचे कार्य भावी पिढ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे.कोरोना व अन्य कारणांमुळे मतदारसंघाचा विकास थांबला होता.आता अत्यंत कमी कालावधीत अधिकाधिक कामे करण्याचा आपला मानस आहे.यापूर्वीच्याही आमदारकीच्या काळात आपण भेदभाव न करता दूरदृष्टीनेच विकासकामे केली.गोंडराजे मैदान विकाससह इतर सर्वच कामे वेळेत,दर्जेदार करावीत,अशी सूचना त्यांनी केली.यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी कामाबद्दल माहिती दिली तर के.मूर्ती यांचेही भाषण झाले. इसाखान यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविकात शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी गत ५ वर्षातील विकासकामांचा आढावा घेतला.सूत्रसंचालन बाळकृष्ण कदम यांनी केले.नगरसेवक अभय महाजन यांनी आभार मानले.यावेळी शिवराज राघु मामा,अजय नेम्मानीवार,गंगारेड्डी बैनमवार,तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे,प्रतीक केराम,नगरसेवक अजय चाडावार ,नीळकंठ कातले,संतोष मरस्कोल्हे,संजय रेड्डी,दत्ता आडे,नगरसेविका जिजाबाई मेश्राम,नगरसेवक शिवा आंधळे यांच्यासह बालाजी धोत्रे,नरेंद्र सिरमनवार,शिवा क्यातमवार,भाऊराव राठोड,मधुकर अन्नेलवार,मारुती भरकड,जयराज वर्मा,उमाकांत कऱ्हाळे,स्वागत आईनेनिवार, आदिवासी नेते जितेंद्र अ .कुलसंगे, संतोष कन्नाके, संतोष पहुरकर, आर्शिष ऊर्वेते ,पवन मंडावी , आर्शिष कुमरे , बालाजी सिडाम ,धनराज पेन्दोर, अशोक नैताम , डॉ गुहाडे ,रोहित अ.कुलसंगे ,नरसिंग तक्कलवार,राजेंद्र भातनासे, मारोती सूनकलवाड, भाऊराव राठोड,सुरेखा घाटकर,गौरव इटकेपेल्लीवार ,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि आदिवासी समाजबांधव आदींची उपस्थिती होती.तत्पूर्वी दत्तनगर गोकुंदा बिरसा मुंडा चौक येथून आदिवासी पारंपरिक वेशभूषेत रॅली काढण्यात आली,रॅली बिरसा मुंडा चौक किनवट येथे आल्यानंतर सर्वप्रथम आ.केराम यांच्यासह मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन, नगरपरिषद विकास कामाचे उद्घाटन, माजी नगराध्यक्ष सत्कार सोहळा,किनवट बसस्थानक येथे बिरसा मुंडा प्रतिमेचे अनावरण आमदार केराम साहेबांच्या हस्ते करण्यात आले,राजगड येथे बिरसा मुंडा क्रांती योजना विहीर उद्घाटन,माहूर पंचायत समिती येथे बिरसा मुंडा क्रांती योजना व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंब योजनेच्या विहिरीच्या लाभार्थ्यांना कार्याआरंभ आदेशांचे वाटप,माहूर येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या रॅली नंतर कार्यक्रमांचे समारोप झाले.किनवट भागातील कार्यक्रमांचे नियोजन नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, अनिल तिरमनवार,प्रतीक केराम,दत्ता आडे,श्रीनिवास नेम्मानिवार,अनिल सरपंच,प्रकाश कुडमेथे व माहामानव भगवान बिरसा मुंडा जयंती समिती ता किनवट आणि इतर आदिवासी पदाधिकारी, युवा कार्यकर्ते यांनी केले .!

187 Views
बातमी शेअर करा