किनवट/ प्रतिनिधी:
शासनाने केलेल्या कर्ज माफीच्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे.या विषयाचे अर्ज मा.सहायक जिल्हाधिकारी किनवट व व्यवस्थापक एस.बी.आय. सारखानी यांच्याकडे बजरंग वाडगुरे (उमरी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख) यांनी निवेदन सादर केले आहे.
सन 2020-21 या कालावधीत खरीप हंगामातील राहिलेली शेतकरी यांचे मौजे उमरी बाजार सर्कल अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकरी खातेदारास शाखा सारखणी स्टेट बँक ऑफ इंडिया, उमरी येथील मराठवाडा ग्रामीण बँक या शाखेतील सर्व शेतकरी मागील वर्षी पीक कर्ज वाटप करण्यात आले. मात्र मागील वर्षातील सारखणी येथील एसबीआयच्या शाखेतील सन 2020 चे बरेच शेतकरी खातेदारांना पीक कर्ज वाटप करण्यात आले नाही. पूर्ण कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करून सुद्धा शेतकऱ्यांना वेळेअभावी कागदपत्र वापस केल्याचे प्रकरण आढळून आले आहे. कागदपत्र काढण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर पैसे लागतो तसेच वेळही वाया जात आहे. येथील लोकप्रतिनिधीं हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत भाऊ पाटील व किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मागील वर्षी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पीक कर्जवाटप मंजुरी आणून शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करावे असे आदेश काढून सुद्धा सारखणी येथील मॅनेजर मनमानी कारभार करत आहे यापुढे गावोगावी यादी लावून पीक कर्ज वाटप करावे व शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त काऊंटर तयार करून पीक कर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाने केलेल्या कर्ज माफीच्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे- बजरंग वाडगुरे
173 Views