किनवट, दि.१४(प्रतिनिधी) शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी पुढाकार घेतला असून शेतीमध्ये झालेले नुकसान त्यासोबतच माहूर किनवट तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची गुहे आमदार भीमराव केराम यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्यांनी पुढील विकासाची घोडदौड चालू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
किनवट शहरातील गोंडराजे मैदान येथील सार्वजनिक विचार पिठाचे उद्घाटन करून यानंतर आमदार भीमराव किरण यांच्या हस्ते मोहोळ तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा शेतकरी स्वाभिमानी योजना अंतर्गत मंजूर झालेल्या शेतकरी विहीर संबंधित शेतकऱ्यांना वितरित करण्याचा कार्यक्रम ता.१५ रोजी आयोजित केलेल्या आहे. यापूर्वीही शेतकरी स्वावलंबन योजनेअंतर्गत असे खूप काही योजना शेतकऱ्यांसाठी येत होते परंतु त्याचा पाठपुरावा होत नसल्याकारणाने सदरील योजना अडगडीत पडत होते. भीमराव केराम यांनी या योजनेमधील सविस्तर सोपस्कार पूर्ण करून सहजरित्या संबंधित शेतकऱ्यांना ही योजना भेटावी या दृष्टिकोनातून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बिरसा मुंडा क्रांती योजनेच्या अंतर्गत माहूर तालुक्यातील ३४ ठिकाणी सिंचन विहीर वाटप करण्याचे ता.१५ रोजी आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणारअसून श्रमजीवी आदिवासी बांधवांना या योजनेचा लाभ मिळेल या दृष्टिकोनातून आमदार भीमराव केराम यांनी कार्यक्रम राबविला असून आदिवासी समाज घटकातील सर्व संबंधित बांधवांना आवाहन करण्यात येते की त्यांनी प्रस्तुत कार्यक्रमाला माहूर पंचायत समितीच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात उपस्थित राहून आपल्या लाभ घ्यावा असे आमदार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.