किनवट/प्रतिनिधी:(12 नोव्हेंबर) किनवट आगाराची बस किनवटहुन 6 प्रवासी घेऊन औरंगाबाद कडे जात असताना रोहिदास तांडा जवळ पलटी झाली भरधाव वेगात असलेल्या गाडीच्या समोरच्याला गाढव आल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने प्रवासी सर्व सुखरूप आहेत. परंतु बसच्या समोरील मोठा काच आणि पाठीमागील खिडक्या त्यामुळे एक लाखाच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे सहाय्यक कार्यालय अधीक्षक खिलारे यांनी सांगितले.
सदरील अपघात 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान झाला.
किनवट आगाराची बस क्रमांक एम एच 20 पी एल 4011 ही गाडी आज 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता औरंगाबाद कडे जाण्यासाठी निघाली होती परंतु किनवट पासून जवळ असलेल्या रोहिदास तांड्याजवळ अचानक गाडी समोर गाढव आल्याने गाडी रस्त्याच्या खाली उतरली.व पलटी झाली.यात सहा प्रवासी होते परंतु सुदैवाने कोणासही मोठी दुखापत झाली नाही. अपघातग्रस्त गाडीवर चालक म्हणून गजानन उईके व वाहन चालक म्हणून आर एस नेरले हे होते.
अपघाताची माहिती मिळतात सहाय्यक कार्यालय अधीक्षक खिल्लारे घटनास्थळी पोहोचले. पंचनाम्या दरम्यान गाडीचे एक लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगितले. किनवट आगारातील काही गाड्या नेहमीच रस्त्यावर नादुरुस्त होऊन प्रवाशाचे हाल होत असल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले .
किनवट आगाराची बस औरंगाबाद कडे जात असताना रोहिदास तांडयाजवळ पलटी प्रवासी बाल बाल बचावले.
968 Views