किनवट /प्रतिनिधी :कनकी येथील 33/ 11 के.व्ही. उपकेंद्राचे लोकार्पण प्रगतिशील शेतकरी सी.दिलीप रेड्डी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष के.सूर्यकांत रेड्डी, कुंदन पवार, बाबू नाईक, कार्यकारी अभियंता चितळे, उपकार्यकारी अभियंता गोरले, कनिष्ठ अभियंता जाधव, ईश्वर चव्हाण, सरपंच सुदर्शन आत्राम, उपसरपंच विनोद राठोड, ग्रामसेवक बोरकर, के. प्रशांत रेड्डी, कैलास राठोड, पवन चव्हाण, निशांत जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी विद्युत कर्मचाऱ्यांच्या वतीने 33 केव्ही उपकेंद्रासाठी लागणारी जमीन दान दिल्यामुळे सी.दिलीप रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला.
142 Views